पुणे विभागात 65 हजार 200 स्थलांतरित मजुरांची सोय ; 1 लाख 19 हजार मजुरांना भोजन

Read Time1 Minute, 59 Second

पुणे विभागात 24 हजार 782 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 979 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर.पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.विभागात अंदाजे 24 हजार 782 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 979 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 12 हजार 436 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 12 हजार क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.पुणे विभागात 5 एप्रिल 2020 रोजी 99.687 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.90 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 116 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 574 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 690 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.या कॅम्पमध्ये 65 हजार 200 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 19 हजार 480 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post NRMU या रेल्वेच्या संघटनेकडुन रेल्वे हॉस्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज वाटप
Next post उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद.
error: Content is protected !!
%d bloggers like this: