संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
यात्रेत असणाऱ्या म ती रेल्वे प्रवास, बस प्रवास,पायी प्रवास,छोट्या मोठ्या वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी म्हणजेच सर्व प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला प्रवासात मदत करणे त्यांच्या सुख सुविधांसाठी सहकार्य करणे हा या संघटनेचा उद्दिष्ट असून त्याला अनुसरून प्रवासी हिताचे कार्य करत सेवा करणार
सूर्यकांत कदम नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
चाळीसगाव(प्रतिनिधी) – पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन इंडिया यात्रि कल्याण, रेल्वे प्रवासी, बस प्रवासी पैदल प्रवासी, छोठे वाहन प्रवासी यांच्या हितासाठी व हक्कासाठी पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन इंडिया यात्रि कल्याण संघाची स्थापना करण्यात आली आहे. दैनिक भास्कर चे पत्रकार तथा आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन (ऑल इंडिया पत्रकार संघटना) चे महाराष्ट्र – गुजरात – गोवा – मध्यप्रदेश प्रभारी प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत कदम (चाळीसगाव जि जळगांव) यांची यात्री कल्याण संघ भारत च्या पॅसेंजर वेलफेअर असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथ तिवारी (गुजरात) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतिश परदेशी (मनमाड) यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.