
पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून 2,25000 रुपयांचा किराणा होणार 1111 कुटुंबाना वाटप,चाळीसगांव MIDC मधील गुजरात अंबुजा कंपनीचे सुद्धा सहकार्य
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव पोलिसांनी गरीबांना मदतीचा हात देत आज पुन्हा सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने आपल्या पगारातून 2,25000 रु एवढी रक्कम जमा केली आहे व या रकमेतून 1111 कुटुंबांना किराणा माल वाटप करण्यात येईल सोबत मदतीला चाााळीसगांव MIDC मधील गुजरात अंबुजा कंपनी सुद्धा धावून आली आहे ,चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधीक्षक मा सचिन गोऱ्हे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी मा गावडे सो यांचे मार्गदर्शनाने, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोनि विजयकुमार ठाकूरवाड सो यांनी त्याचे सहकारी सपोनि आशिष रोही, मयूर भामरे, पोउपनि जाधव व साठे व समस्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी
कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे लॉकडाउन विचारात घेता, अनेक हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांचे रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, याची जाणीव लक्षात घेऊन
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे पगारातून जमा केलेले 2,25000 रुपये व चाळीसगाव येथील गुजरात अंबुजा कंपनी यांचेकडील सहाय्य यातून चाळीसगाव शहरातील गरजू व गरीब 1111 कुटुंबाना किराणा मालाचे वाटप त्यांचे घरी जाऊन करण्यात येणार आहे.
यामध्ये चाााळीसगांव MIDC मधील गुजरात अंबुजा कंपनीकडून 4000 किलो तांदूळ व 1111 तेलाच्या बॅग असे किराणा साहित्य प्राप्त झाले असून, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या जमा रकमेतून 1111 गव्हाच्या पिठाच्या प्रत्येकी 5 किलोच्या बॅग, 1111 किलो डाळ, 1000 किलो तांदूळ असा किराणा माल विकत घेऊन तो प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी 5 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ, 1 किलो डाळ, 1 लिटर तेल असे किराणा मालाचे किट एकत्रितपणे शहरातील गरजू व गरीब कुटुंबांना घरपोच देण्यात येणार आहे.

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating