Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पोलीस चौक्यांचे स्वातंत्र्य दिनाला भूमिपूजन आणि ५ महिन्यातच प्रजासत्ताक दिनाला लोकार्पण…

0
0 0
Read Time9 Minute, 18 Second

 

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)– आपले शहर,गाव, तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असते, मात्र पोलीस प्रशासनाला अपेक्षित असणाऱ्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार मिळाला तर काय बदल होऊ शकतो याचे एक चांगले उदाहरण चाळीसगाव शहरात घडले आहे. जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव शहर हे दळणवळणाचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या सुरक्षा पाहणाऱ्या पोलिसांची जबाबदारी देखील वाढते. मात्र चाळीसगाव शहरात पोलिसांना गस्तीसाठी व नागरिकांना तात्काळ मदतीसाठी असणाऱ्या नागद चौफुली व रेल्वे स्टेशन जवळील पोलीस चौक्या मोडकळीस आल्याने काही वर्षांपासून बंद होत्या. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांची देखील मोठी गैरसोय होत होती. हि बाब चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी नागद चौफुली व रेल्वे स्टेशन जवळील जुन्या पोलीस चौक्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला तसेच चाळीसगाव शहराचे जकात नाके असणारे खरजई नाका व करगाव रेल्वे बोगदा येथे सुसज्ज अश्या दोन नवीन पोलीस चौक्या आमदार निधीतून बांधकाम करण्याचा संकल्प केला.

 

गेल्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२३ रोजी या ४ पोलीस चौक्यांचे बांधकाम व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आमदार मंगेशदादा चव्हाण व जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते करण्यात आले होते. अवघ्या ५ महिन्यात या चारही पोलीस चौक्यांचे काम पूर्ण करून प्रजासत्ताक दिनाच्या दोनच दिवसानंतर दि.२८ जानेवारी २०२४ रोजी आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे चाळीसगाव वासियांना आता पोलिसांचे चारही बाजुंनी सुरक्षा कवच मिळणार आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती साहेबराव राठोड, सौ.देवयानीताई ठाकरे, जेष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, उद्धवराव महाजन, राजेंद्र चौधरी, रविंद्र पाटील, संजय भास्करराव पाटील, संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील, अविनाश चौधरी, सतीश पाटे, धनंजय मांडोळे, चिराग शेख, निलेश वाणी, मनोज गोसावी, एड.कैलास आगोणे, सोमसिंग राजपूत, सुभाष बजाज, अभय वाघ, सचिन दायमा, विवेक चौधरी, भावेश कोठावदे, पप्पूराज माळी, योगेश खंडेलवाल, राकेश बोरसे, प्रवीण मराठे, अजय वाणी, जितेंद्र पाटील डॉ.प्रशांत एरंडे, रियाज प्रिन्स, विनोद घुमरे, दिनेश चौधरी, सचिन स्वार, हर्षल चौधरी, योगेश गव्हाणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, परिसरातील व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पोलीस चौक्यांचे स्वातंत्र्य दिनाला भूमिपूजन आणि ५ महिन्यातच प्रजासत्ताक दिनाला लोकार्पण…

 

 

आमदार मंगेश चव्हाण नेहमी म्हणत असतात कि ज्या कामांचे मी भूमिपूजन केले त्या कामांचे लोकार्पण देखील मीच करणार, आणि त्यांनी या चार पोलीस चौक्यांच्या कामाच्या माध्यमातून त्याची प्रचीती दिल्याने त्यांच्या विकासात्मक कामांच्या या आदर्श पॅटर्नचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या या स्थुत्य उपक्रमामुळे चाळीसगावकरांना पोलीस आता हाकेच्या अंतरावर उपलब्ध होणार आहेत, तसेच चारही बाजुंनी पोलिसांची सुरक्षा असल्याने चोऱ्या आणि छोट्या मोठ्या गुन्ह्यांना देखील आळा बसणार आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा हि माझी जबाबदारी आहे, मी कधीही पोलिसांना अथवा शासकीय अधिकाऱ्यांना चुकीच्या कामासाठी फोन करत नाही अथवा दबाव आणत नाही, उलट त्यांच्या अडीअडचणी समजून घेत प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला काय सेवा देता येईल यासाठी माझा पाठपुरावा सुरु असतो. त्यामुळे पोलीस बांधवांकडून केवळ सुरक्षेची अपेक्षा न ठेवता त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी यामाध्यमातून केल्याचे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी केले.

 

काय काय सुविधा असणार आहेत या पोलीस चौक्यांमध्ये ?

 

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या व नूतनीकरण करण्यात आलेल्या या चारही बीटच्या पोलीस चौक्यांमध्ये एक पीएसआय, एक अमलदार व बीट अंतर्गत जबाबदारी असणारे पोलीस कर्मचारी यांना बैठक व्यवस्था, सुसज्ज स्वच्छतागृह असणार आहे, संपूर्ण पोलीस चौकी पीओपी केली असून प्रशस्त दरवाजे खिडक्या असल्याने हवा खेळती राहणार आहे. यासोबतच चौकीला मार्बल व ग्रेनाईट टाईल्स, लाईट फिटिंग देखील अत्याधुनिक पद्घतीची बसविण्यात आली आहे. सोबत टेबल, खुर्च्या, फॅन आदी व्यवस्था असणार आहे. सदर चौक्या उभारणीची जबाबदारी हि ठेकेदार भूषण पाटील यांना देण्यात आली होती.

 

 

पोलीस आता हाकेच्या अंतरावर…

 

यापूर्वी सर्व बीट चा कारभार हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शहर पोलीस स्टेशन येथून चालत होता. शहरातील रहदारी व शहराचा झालेला विस्तार यामुळे मदत पोहोचण्यास देखील थोडा उशीर होताना दिसत होता. शहराच्या चारही बाजुंनी पोलीस चौक्या उभ्या राहिल्याने नागरिकांना पोलिसांची मदत आता हाकेच्या अंतरावर मिळणार आहे. ११२ ला फोन करून पोलिसांकडे मदत मागितल्यास तत्काळ जवळच्या पोलीस चौकीतून पोलिसांची मदत नागरिकांना मिळेल.

 

बीटनिहाय हे अधिकारी – कर्मचारी असतील कर्तव्यावर –

घाट रोड बीट पोलीस चौकी – पीएसआय ढिकले व सुभाष पाटील अमलदार

रेल्वे स्टेशन बीट पोलीस चौकी – पीएसआय टकले व अमलदार दत्ता महाजन

खरजई बीट पोलीस चौकी (करगाव बोगदा) – पीएसआय बिरारी व अमलदार मालचे

पातोंडा बीट पोलीस चौकी (खरजई नाका) – पीएसआय आव्हाड व अमलदार पंकज पाटील

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: