Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड व मेडीक्लेम सुविधा द्या- गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

0
1 0
Read Time5 Minute, 29 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड व मेडिक्लेम सुविधा द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद प्रकल्प संचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,समग्र शिक्षा अंतर्गंत संपुर्ण राज्यभरात जिल्हा, तालुका , केंद्रस्तरावर विविध केडरचे सुमारे 6000 कर्मचारी कार्यरत आहेत. सदरचे कार्यरत कर्मचारी सन 2004 पासून कार्यरत आहेत. सदर कर्मचारी नियुक्ती कालावधीपासूनच अगदी तुजपुज्या मानधनावर कार्यरत असूनही २० वर्षापासून इमाने-इतबारे काम करत आहेत. सदरचे काम करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. त्यांची भविष्याची कोणतीही तरतूद नाही.हे सर्व कर्मचारी त्यांचे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असून त्यांचा प्रपंच यावरच चालू आहे. हे कर्मचारी जर आजारी पडले तर त्यांचे कुटंबाची पुर्ण वाताहत होते . यामध्ये गंभिर आजारपणाचा ही समावेश आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांचा उपचाराला पैसे नसल्याने मृत्यू झाला आहे.आशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची कुटंबाची अक्षरश: फरफट झाली आहे. त्यांच्यासाठी भविष्यात कोणतीही आर्थिक तरतूद नाही. शासकीय आस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत अशी दुरावस्था ही लोककल्याणकारी राज्याला हरताळ फासणारी बाब आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापैकी संपुर्ण राज्यभरात सुमारे २५० पेक्षा जास्त कर्मचारी विविध कारणांनी मृत्यूमुखी पडले आहेत. सदर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबात कोणी ही कमावता नसल्या कारणाने त्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. या कर्मचाऱ्यामध्ये कमावता व्यक्ती नसल्याने त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत पुर्ण बंद झाले आणि ही कुटुंब अक्षरश: रस्तावर आली आहेत. जर या कर्मचाऱ्याचा प्राँव्हिडंट फंड काढण्यात आला असता तर या कुटुंबांना या प्राँव्हिडंट फंडातील रकमेचा काही तरी हातीभार लागला असता. त्यांना मदत मिळाली असती.

प्राँव्हिडंट फंड व मेडिक्लेम या सुविधा तर खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला ही असतात .अगदी सुरक्षा रक्षकाचे काम करणा-या कामगाराला ही असतात. मग समग्र शिक्षा अंतर्गत काम करणारे कर्मचारी हे जरी कंत्राटी असले तरी शासनाच्या आस्थापनेवर काम करणारे कर्मचारी आहेत. परंतू शासन त्यांचेबाबत असा दुजाभाव का करत आहे. वर्षानूवर्ष त्यांना या सुविधांपासून वंचित ठेऊन त्यांचेवर अन्याय करण्यात आलेला आहे.

तरी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाकडून प्रमुख या दोन मागण्या करण्यात येत आहेत.

समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचे प्राँव्हिडंट फंडाचे खाते तात्काळ उघडण्यात यावे व पुर्वलक्षी प्रभावाने त्यात फंडाची रक्कम ते जेव्हा पासून नियुक्त झाले आहेत तेव्हा पासून जमा करावी.

समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना त्यांच्या कुटंबातील सर्व सदस्यांसहीत मेडिक्लेम सुविधा तात्काळ लागू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,राज्य प्रवक्ते विनोद चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष उत्तम जावळे , राज्य संघटक सत्यदेव खाडे ,दौंड तालुका अध्यक्ष गोविंद जाधव व तालुका महासचिव शिवकांत अडसूळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: