दौंड(प्रतिनिधी):- सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,जगभरात सर्वत्र पसरत असलेल्या नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. सध्या राज्यात Novel Corona Virus(Covid-19)प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून २०२० करीता मोफत तांदूळ वितरित करावयाचा आहे.त्यापैकी तांदळाचे माहे एप्रिल २०२० चे मासिक नियतन प्राप्त झालेले आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी की,सदर मोफत तांदूळ रेशन कार्ड धारकांना अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेंतर्गत देय असलेल्या धान्याची उचल केलेली आहे.त्यांनाच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्य व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महा ५ किलो अन्नधान्य मोफत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिमहा ५ किलो अन्नधान्य त्याचप्रमाणे अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना देखील त्या कुटुंबामध्ये शिधापत्रिकेतील नोंदि नुसार प्रत्यक्ष असलेल्या सदस्यांना देखील प्रति सदस्य प्रति महा ५ किलो याच परिमाणात मोफत तांदूळ वितरित करणार आहे. तसेच माहे एप्रिल २०२० या महिन्याचे नियमित धान्य गहू २ रु किलो व तांदूळ ३ रु.किलो याप्रमाणे अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना दिनांक १ एप्रिल २०२० ते १० एप्रिल २०२० पर्यंत करण्यात येणार आहे व तदनंतर मोफत तांदळाचे वाटप करण्यात येईल.सदर मोफत तांदळाचे वाटप करत असताना त्या लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे याची खातरजमा करण्यात येणार आहे.तरी सर्व रास्तभाव दुकानदारांना सूचित करण्यात आलेले आहे की,अन्नसुरक्षा योजनेअंतर्गतचे धान्य वाटप १ एप्रिल २०२० ते १० एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करावे.तद्नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत तांदळाचे वितरण करण्यात येईल.तसेच सर्व रास्तभाव दुकानदारांवर सनियंत्रण अधिकारी म्हणून त्या त्या भागातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती की त्यांनी वेळेत धान्याची उचल करावी व धान्य घेण्यासाठी गर्दी करू नये.अशी माहिती दौंड चे तहसीलदार मा:संजय पाटील यांनी दिली
Read Time3 Minute, 56 Second