प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेचे आयोजन,75 योजनांचे 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न-खासदार उन्मेष पाटील

0 0
Read Time5 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव आपण साजरा करतो आहोत. अनेक योजना या लोकप्रिय झाल्या मात्र अनेक योजना या लाभार्थ्यांचे जनकल्याण आत्मनिर्भर होण्यासाठी पुरक असताना त्या योजनेबद्दल गैरसमज आहे. योजना न समजता पाठपुरावा केला तर पदरी निराशा येते. त्यामूळे योजनेचा उद्देश सफल होत नाही.त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. ही बाब आमदार असताना अभ्यासली आणि लाखो लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासकीय योजनांची जत्रा भरविली.त्याच धर्तीवर पुन्हा एकदा शासनाच्या शेकडो योजना असल्या तरी खऱ्या अर्थाने शेतकरी, युवा, महीला, ज्येष्ठांच्या आरोग्य ते आत्मनिर्भर तसेच विमा ते उद्योग अशा 75 योजनांचे माहिती पत्रक आपल्या हाती दिले आहे.या केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी 75 योजनाचे 75 स्टॉल उभारून 75 योजना दुतांच्या माध्यमातून 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात,एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच छताखाली, प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेचे आयोजन करण्यात येणार असून या जनजागृतीसाठी सात जनजागृती एलईडी व्हॅन व सात जनजागृती चित्ररथांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आनंद आहे.
प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेच्या अनुषंगाने व वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन चाळीसगाव येथील राजपूत मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपचे राज्य प्रवक्ते संजय शर्मा, योगाचार्य वसंतरावजी चंद्रात्रे, पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करण दादा पवार, युवा नेते अमोल भाऊ शिंदे, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, नांदगाव नगराध्यक्ष राजेश दादा कवडे, मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्हा सेक्रेटरी निंबा नाना मराठे,जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप तालुका अध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, माजी पंचायत सभापती संजय पाटील, पालिकेतील गटनेते संजय आबा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजू आण्णा चौधरी ग्रामसेवक संघटनेचे राज्य पदाधिकारी संजीव निकम, जीप सदस्य धर्माआबा वाघ, उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे,तालुका सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ,अमोल चव्हाण, धनंजय मांडोळे, गिरीश ब -हाटे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बागुल,नगरसेवक नितीन पाटील, चिराग शेख, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, विजय प्रकाश पवार, विजया भिकन पवार,माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, मुख्याध्यापक रमेश सोनवणे, विवेक चौधरी, माजी उपसभापती भाऊसाहेब पाटील, मार्केट संचालक विश्वजीत पाटील, पत्रकार संघाचे एम. बी. पाटील,विश्वासराव चव्हाण, नमोताई राठोड, सदानंद चौधरी,राजेंद्र पगार ,बबन पवार, प्रदीप राजपूत रवींद्र चौधरी तरवाडे, प्रकाश पवार , मिनाताई महाजन, पद्माकर दादा पाटील, जगत बापु अहिरराव, भैय्यासाहेब पाटील,सुवर्णाताई राजपूत,सौरव पाटील , पप्पू राजपुत, चेतन वाघ,आदर्श शिक्षक पवार गुरुजी, प्रवीण पाटील वाघडूकर, सुभाष पाटील, एड. राजेंद्र सोनवणे, नरेंद्र काका जैन, रवी आबा राजपूत, समकित छाजेड यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.