प्रभाग क्रमांक-1 मधील नगरसेविका सौ:रिजवाना अकबर पानसरे यांच्या मार्फ़त प्रभागात जंतुनाशक फवारणी
दौंड(पवन साळवे) कोरोना Covid-19 या आजाराने संपूर्ण जगात थैमान माजले आहे त्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व डॉक्टर्स, पोलीस,सामाजिक संघटना,सरकारी यंत्रणा,आपापल्या प्रभागातील जनतेची काळजी घेण्यासाठी सर्व प्रतिनिधी कोरोना नावाच्या विषाणूला रोखण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करत त्याच हेतूने दौंड शहरातील प्रभाग क्रमांक-1 मधील नगरसेविका सौ:रिजवाना अकबर पानसरे यांनी आपल्या प्रभागातील नवगिरे वस्ती,सिद्धार्थ नगर,पानसरे वस्ती,पोस्ट ऑफिस परिसर याठिकाणी जंतुनाशक फवारणी करून त्या प्रभागातील जनतेची काळीज घेत आहे.व तेथील काही स्थानिक लोक ही मदतीचा हात देऊन सहकार्य करत आहेत.अफजल पानसरे,मिलिंद उजगरे.पिंकू झेंडे.निखिल बारंगळे. अतुल वाघचौरे,राकेश फिलिप,श्रीकांत कांबळे.अभिषेक साळवे अन्य सहकारी वर्गाने सहकार्य केले.