अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या पगारास विलंब झाला आहे .त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे माहे फेब्रुवारी २०२२ चे वेतनास तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे विलंब झालेला आहे . त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना गृहकर्ज, वाहन कर्ज ,शिक्षक पतसंस्थेच्या कर्जाचे हप्ते किंवा इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करता आली नाही .त्यामुळे शिक्षकांना संबंधीत वित्तिय संस्थांनी दंड व्याज आकारले आहे .त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना विनाकारण आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे . तसेच कुटुंबातील आजारी असलेल्या लहानग्यांना व वृद्धांना वेळेवर औषधोपचार करता आले नाहीत .त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबातील व्यक्तींचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडले आहे .या सर्व बाबींना तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे . विशेष म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी व मार्च २०२२ या दोन महिन्याचा पगार केलेला आहे .परंतु प्राथमिक शिक्षण विभाग फेब्रुवारीचा पगार काही तालुक्यात अद्याप करू शकला नाही .ही बाब गंभीर असल्यामुळे आपण संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी विनंती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .