अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा

बँक आँफ बडौदा कृषी व महीला स्वयं सहायता गट कर्ज वितरण मेळावा संपन्न : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांची उपस्थिती
चाळीसगाव —- बँकांच्या माध्यमातून कृषी व महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात पत पुरवठा देण्यात येत आहे. आज 401 शेतकऱ्यांना 6 कोटी 90 लाख पिककर्ज तर 140 महीला बचत 1 कोटी 60 लाख तसेच 196 शेतकरी बांधवांना 3.26 कोटी इतर कर्ज
असे 737 लाभार्थींना 11. कोटी 77 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. बँक ऑफ बडोदाने निश्चितच पुढाकार घेऊन सर्व लाभार्थ्याचा मेळावा आयोजित केला असून यापुढे देखील बँकेने शेतकरी बंधू व बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. यामुळे बँकांच्या विविध योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले
आज बँक आँफ बडौदाच्या वतीने चाळीसगांव शहरातील अरीहंत कार्यालय येथे कृषी व महीला स्वयं सहायता गट कर्ज वितरण मेळावा आयोजीत केला होता. सदर कार्यक्रमाला खासदार उन्मेशदादा पाटील, जिल्हाधीकारी डॉ. अभिजीत राऊत व बँक आँफ बडौदा चे क्षेत्रीय प्रमुख अरुण मिश्रा व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात
401 शेतकरी पिककर्ज
140 महीला गटांना अर्थ सहाय्य
196 शेतकऱ्यांना इतर कर्ज
असे 737 लाभार्थींना कर्ज वितरण आदेश खासदार उन्मेश दादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की बँक आँफ बडौदाच्या ह्या उपक्रमाचे कौतुक करतो. कोरोना काळात बँकेने सामाजीक बांधीलकीची जाणीव ठेऊन सामान्य शेतकरी बांधवांना परत जोमाने उभे राहण्यासाठी मदत केली आहे. त्याच प्रमाणे महिला बचत गटांना प्रोत्साहन देत त्यांना मोठ्या प्रमाणात पत पुरवठा देण्यात आला याबद्दल बँकेच्या सर्व शाखाधिकारी व अग्रणी बँकेचे अधिकारी यांचे अभिनंदन करतो असे खासदार उन्मेश दादा पाटील म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत येत्या काळात शेवटच्या घटकाला पत पुरवठा करून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बँक आँफ बडौदा चे क्षेत्रीय प्रमुख अरुण मिश्रा यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या वाटचालीचा आढावा सादर करून खासदार उन्मेश दादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांचा सत्कार केला. याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने उपस्थित अधिकारी, कर्मचारी उपस्थित भारावले होते.
कार्यक्रमाला प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातालकर, तहसीलदार अमोल मोरे
बँक आँफ बडौदाचे उपक्षेत्रीय प्रमुख डॉ. बी. आर. चौधरी व चाळीसगांव शाखेचा व्यवस्थापक राहुल नाईक, राकेश कुमार, योगेश नागे, महेश मोरे, मुकेश पाटील, गणेश तळेले, कुमुदीनी बच्छाव आदी कर्मचारी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव मांडेकर आभार उप क्षेत्रीय प्रबंधक डॉ. चौधरी यांनी मानले.