Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

बनावट सह्या करत अनुदान लाटले तर लाटले,बचत गटाच्या नावाने बनावट बँक अकाऊंट पण सुरू,ठगण्यात तो ठेकेदार वाटतोय गुरू?

0

प्रतिकात्मक चित्र

0 0
Read Time4 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव : काही दिवसांपुर्वी चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने धुळे येथील बोगस पुरवठेदाराने बचत गटाचे अनुदान परस्पर लाटले असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याच पार्श्वभुमीवर बचत गटाच्या अध्यक्षांनी सखोल चौकशी केली असता याच बचत गटाच्या नावाने धुळ्याच्या बँकेत त्या पुरवठादाराने बनावट खाते उघडले असल्याचे उघडकीस आले असुन त्या बोगस ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी बचत गटाच्या अध्यक्षा यांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, लता सुभाष अग्रवाल या चाळीसगाव येथील रहिवाशी असून त्या चाळीसगावच्या जय माता दी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाची अध्यक्षा व माता माधवी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाच्या सदस्या आहेत. त्यांनी दिनांक 01/07/2021 सदर बचत गटाच्या नावाने धुळे येथील बोगस पुरवठादाराने एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) भुसावळ या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा आधार घेत बचत गटातील सदस्यांच्या खोट्या सह्या करून परस्पर अनुदान लाटल्या संदर्भात अनेक वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्धीसाठी दिले होते. त्या वृत्ताची दखल घेत अनेक वृत्तपत्रांनी वृत्त प्रसिद्धीस देखील दिले होते. याबाबत बचत गटाच्या अध्यक्षांनी सखोल चौकशी केली असता धुळे येथील त्या बोगस पुरवठेदारांनी वरील दोन्ही बचत गटाच्या नावाने धुळे येथील बँक ऑफ इंडिया, शाखा धुळे येथे दिनांक 31/8/2008 रोजी खाते क्रमांक 069010110000379 जय मातादी स्वयं सहाय्यता महिला बचत व माता माधवी स्वयं सहाय्यता महिला बचत गट या नावाने खाते क्रमांक 069010110000378 हे खोट्या सह्या करून उघडले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्या पुरवठादाराने चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने विविध ठिकाणी पोषण आहाराची कामे घेऊन या खात्यात परस्पर रक्कम वर्ग केली आहे. वास्तविक बघता धुळे येथे चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने खाते उघलेच कसे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. बचत गटाच्या नावाने खाते उघडताना त्या फॉर्मवर बचत गटातील अध्यक्षा सचिव यांच्या सह्या व बचत गटाचे शिक्के असतात तरीही अध्यक्षांचे कुठेही सह्या व पुर्वपरवानगी न घेता परस्पर खाते उघडले गेले. याबाबत धुळे येथील बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर यांनी शहानिशा करणे गरजेचे होते. ही शहानिशा त्यांनी का केली नाही असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सदरील पोषण आहाराच्या कामकाजा संदर्भात एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील अधिकारी व कर्मचारी कोणाशी वेळोवेळी संपर्कात होते याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. वरील सर्व कारणांचा व परिस्थितीची चौकशी होऊन धुळे येथील बोगस पुरवठादार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी (नागरी) भुसावळ, जि.जळगांव यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच बँकेतील मॅनेजर व संबंधित कर्मचारी यांची देखील सखोल चौकशी होणे गरजेचे आहे जेणेकरून या महिला बचत गटांना न्याय मिळेल. याबाबत बचत गटाच्या अध्यक्षांकडुन चौकशी सुरूच असुन अजुन इतर माहिती उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: