Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

बारामती येथे महाराष्ट्र राज्य बँड बेन्जो चालक कलाकार संघटनेच्या बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर .

1 0
Read Time11 Minute, 38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

बारामती– दिनांक 15 मार्च रोजी बारामती येथे न्यू अक्षदा मंगल कार्यालय मध्ये महाराष्ट्र राज्यातील नामवंत कलाकार व संघटनेचे पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष माननीय शकील भाई झारी यांच्या निमंत्रणावरून व संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव,नाशिकचे प्रख्यात कलाकार शेख मास्टर,पुण्याचे बाळासाहेब आढाव, सातारचे खटाव पंचायत समितीचे माजी उप सभापती आनंदराव भोंडवे,सांगलीचे अरुण कुमार,औरंगाबादचे पैसल चाऊस,पुण्याचे फिरोज भाई मास्टर,नगरचे शांताराम राऊत शेठ,त्याचबरोबर संघटनेचे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीचे नियोजन माननीय शकील भाई झारी साहेब व बारामती तालुक्यातील त्यांची सर्व सहकारी यांच्या प्रयत्नातून संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये संघटनेचे नूतन सरचिटणीस सुभाषराव आडागळे यांनी बैठकीचे इतिवृत्त प्रास्ताविकाच्या स्वरूपात मांडले.प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव यांनी संघटना 2017 सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंतचा आढावा घेऊन त्यामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण झाल्या,त्यामध्ये राज्यातील कलाकार सुद्धा भरडला गेला.त्यामुळे राज्यातील संघटनेचे पदाधिकारी किंवा कलाकार यांच्याशी कोणताही संवाद प्रत्यक्षरीत्या समोरासमोर करता आला नव्हता. त्यासाठी अनलॉक झाल्यावरती प्रथमच बारामती येथे पदाधिकारी व कलाकार यांचा संवाद होण्याचे हेतूने या बैठकीचे नियोजन शकील भाई झारी साहेबांनी केले. यामुळे राज्यातील उपस्थित कलाकार व मालक यांच्याशी संवाद साधता आला आणि तो साधत असताना संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावर व प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे काही प्रमाणामध्ये इतर लोककलावंताच्या मानाने आपला कलाकार जगवता आला. हे संघटनेचे काम होते ते संघटनेचे पार पाडले. हे करत असताना मी स्वतः व माझे सहकारी आणि नाशिकचे शेख मास्टर साहेब या सर्वांनी काम जे केलेले आहे ते कोणीच नाकारू शकत नाही. आणि हे करत असताना आम्ही काम करणाऱ्यांनी सामाजिक भूमिकेतून केलेले आहे ते करत असताना शेख मास्टर आणि मी शकील भाई झारी,सचिन वायदंडे सातारा जिल्हाध्यक्ष,चाऊस मास्तर, मुंबईचे हरीश आलाट व त्यांचे सहकारी,पुण्याचे बाळासाहेब आढाव व त्यांचे सहकारी यांनी यात विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळेच आपल्या बँड मालकांना व कलाकारांना निर्बंध असताना सुद्धा काम करता आले. हे काम करताना संघटनेचे जेवढे पदाधिकारी काम करतात धडपडतात त्यामध्ये इतरांच्या कडून पाहिजे तेवढा सपोर्ट मिळत नाही हे दुर्दैव आहे.अजून आपल्याला खूप काम करायचं आहे म्हणजेच आपल्या कलाकारांचे विविध प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मोठ्या ताकतीने उभे राहिले पाहिजे तरच आपण आपले उर्वरित प्रश्न सोडवू शकतो. नाशिकचे शेख मास्टरयांनी आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट आणि कठोर शब्दांमध्ये म्हणाले की संघटनेमध्ये नको त्या माणसांना पदाधिकारी बनवून नाराजी उडवलेली आहे तरी काय हरकत नाही आज आपल्याला आपले जे प्रश्न आहेत त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झालेले आहेत.त्यामध्ये डीजेमुळे आपणाला बँड सिस्टीम बदलावी लागली, त्यामुळे चांगले कलाकार ब्रास बँड मध्ये कमी होत आहेत.आवाजापेक्षा गोडवा महत्त्वाचा त्यासाठी आपण आपली सिस्टीम बदलली पाहिजे . नवीन कलाकार तयार झाला पाहिजे.आपणास जर भावी काळामध्ये टिकायचे असेल तर आपण आपला रेट म्हणजेच आपली बिदागी वाढवली पाहिजे .गाड्यांच्या बाबतीत अडचणी आहेत त्यासाठी आपण म्हणजे संघटनेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब निवेदन देणे अंत्यत गरजेचे आहे. औरंगाबादचे हनीफ भाई मास्तर यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की आपण सगळ्यांनी एकत्र आलो तरच आपले प्रश्न सुटू शकतात आज आपल्या कलाकार वर्गावर ती अनेक अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजेत. वैजापूरचे प्रख्यात बँड मास्टर पैस ल चाऊस आम्ही खूप वाजवतो पण बोलत नाही परंतु बोलणाऱ्याच्या मागे आहोतच त्याप्रमाणे आपण सर्वांनी संघटन चांगल्या पद्धतीने उभे करावे त्यासाठी आमचा पाठिंबा आहेच. सांगलीचे अरुण कुमार यांनी आपल्या मनोगत मध्ये संघटनेच्या कामाचे महत्त्व विशद करत असताना आज जे आपण आहोत ते संघटनेमुळे आहोत त्यासाठी जिल्ह्यामध्ये संघटन वाढले पाहिजे. या संघटनेने गेल्या तीन चार वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे आम्ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये कलाकारांच्या प्रश्नासाठी मोठा मेळावा घेणार आहोत त्यासाठी आम्हाला संघटनेने त्यावेळी योग्य ते सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. सातारचे सचिन वायदंडे यांनी आपल्या मनोगत मध्ये स्पष्ट केले की आज ह्या संघटनेमुळे व्यायाम कलाकारांची चर्चा मंत्रालयात बऱ्याच मंत्र्यांच्या कडे आपला प्रश्न पोचलेला आहे आणि त्यांच्याकडे सतत जाण्या येण्यामुळे आपल्या पदाधिकाऱ्यांचा त्यांच्याशी जो संबंध आला त्या ओळखीचा फायदा घेऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजेच लोककलेचे मान्यता मिळवण्यासाठी आपण आपल्या संघटन वाढवले पाहिजेत त्यासाठी येत्या काळामध्ये बँड महोत्सव असेल अशा उपक्रमांनाआपण प्राधान्य देऊन त्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. मनोगतामध्ये अहमदनगरचे शांताराम राऊत शेठ,बाळासाहेब आढाव, फिरोज भाई,शकील भाई झारी साहेब ,सातारचे बाळासाहेब जाधव, सांगोल्याचे दत्तात्रय जाधव,यांनी आपली मनोगते कलाकारांच्या प्रश्नांच्या संदर्भात चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. सदर चर्चे नंतर राज्याची नूतन कार्यकारणी तयार करून नूतन पदाधिकाऱ्यांचा बारामतीचे शकील भाई झारी साहेब व त्यांचे सहकारी यांच्या वतीने फेटे बाधून श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करून पदाधिकाऱ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. —-नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे—- १) प्रदेशाध्यक्ष- प्रा अशोकराव जाधव सातारा २)प्रदेश कार्याध्यक्ष- रज्जाक शेख नाशिक ३)प्रदेश उपाध्यक्ष – शांताराम शांताराम राऊत अहमदनगर,असलम झारी बारामती , पैसल चाऊस मास्टर औरंगाबाद ४)खजिनदार- शकील भाई झारी बारामती सहाय्यक खजिनदार-सचिन राव वायदंडे सातारा ५)संघटक- आनंदराव भोंडवे सातारा बाळासाहेब आढाव पुणे ६) सरचिटणीस-सुभाषराव आडागळे , सुखदेव मोटमल नाशिक,फिरोज भाई मास्तर पुणे ७) कार्यकारणी सदस्य- अरुण जाधव हरीपूर सांगली, दत्तात्रय जाधव सांगोला, बाळासाहेब जाधव जाधववाडी सातारा, दाऊद इनामदार कोरेगांव सदर बैठकीस अंबादास मिसाळ बीड , कारेगांव चे दाऊद हनिफ इनामदार ,फारुख भाई बागवान,गणेश साळुंखे, अजितराव माने, अनवर इनामदार,अरुण जाधव हरिपूर, सचिन ढावरे साहेब, दिलीप माने पुसेगाव,दौलतराव लोखंडे, आर एस आईवळे,लियाकत भाई बारामती, संजय भिंगारदिवे सातारा, सुनील शिंदे माळेगाव, सर्जेराव पवार पाचवड, इराप्पा चव्हाण पाचवड,वसंत पवार पाचवड,राजेश बिवालकर,योगेश शिंदे नाशिक,सुखदेव मोटमल नाशिक ,ओंकार आढाव पुणे, सुवण गवळी पुणे ,गौरव राऊत अहमदनगर,संदीप भोसले बारामती,गौरव वाडेकर पुणे, हेमंत माने पुणे,जावेद पठाण करमाळा,सोमनाथ माने अंबवडे कोरेगाव, अजय पवार धुळदेव,बाबू सोनवलकर बारामती,संजय गेजगे बारामती, धनंजय भोसले मास्तर नातेपुते ,करण साठे वाई, आबासाहेब नामदास मसवड, अनमोल बँड बीड चे मालक व कलाकार , रवींद्र करे झारगरवाडी असे राज्यातील कलाकार व मालक प्रामुख्याने उपस्थित होते. .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: