
बालविवाह निमूर्लन प्रशिक्षक कार्यशाळा संपन्न,बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
जळगाव-दि. 17 जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करून जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करणे आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येवून एकत्रितरीत्या बालविवाह विरोधात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिव्हेवियर चेंज कम्युनिकेशन (एसबीसी-३) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षकांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) देवेंद्र राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, यूनिसेफ एसबीसी-३ चे निशितकुमार, प्रिया आरते, मीनाकुमारी यादव, पूजा यादव, किरण बिलोरे, नंदू जाधव, नीलेश सातपुते आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी बालविवाह रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष या विभागांचा समावेश असून या विभागांसोबत मुलींच्या सक्षमीकरणासाठी एकत्रितरीत्या काम करून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यावेळी जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करू अशी शपथ सर्व सहभागींनी घेतली.
Related
More Stories
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते...
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
Average Rating