अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
भडगाव(प्रतिनिधी)- दि 24 महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे वादळ उठलेले आहे,शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून त्यांच्या सोबत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार बंडात सामील असल्याचे सांगितले जात आहे,या बंडात सामील झालेल्या आमदारांमध्ये भडगाव पाचोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे सुद्धा सामील आहे.

याचाच परिणाम म्हणून भडगाव येथे सुद्धा शिवसेनेमध्ये दोन गट पाहायला मिळत आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी असलेले हे शिंदे गटाकडून म्हणजेच आमदार पाटील यांच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत मात्र महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी व कट्टर शिवसैनिक आज सुद्धा पक्षप्रमुखांच्या पाठीशी उभे असल्याचे युवासेनेने स्पष्ट केले आहे,आज युवा सेने तर्फे एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच भडगाव तालुक्यातील कट्टर शिवसैनिक उपस्थित होते, यावेळी युवासेनेचे लखीचंद पाटील, निलेश पाटील, रघुनंदन पाटील यांनी स्वतःच रक्त देवुन उध्दवसाहेबांना पत्र दीले “खुन दीया है जान भी देंगे!” असे आपल्या रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन पत्र लिहिले आहे,यावेळी कट्टर शिवसैनिकांनी “खून दिया हे जान भी देंगे” पक्षप्रमुखांना उद्धवजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी भडगाव शहर व तालुक्यातील महिला आघाडीचे पुष्पाताई परदेशी, शिवसेना – युवासेनेचे सरचिटणीस लखीचंद पाटील, डॉ.प्रमोद पाटील, दिपक पाटील, गोरख पाटील, मनोहर चौधरी, गणेश परदेशी, अनिल महाजन, बंटी सोनार, जे.के. पाटील, नरेश पाटील, माधव राजपूत, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे, पिंटू मराठे, राहुल पाटील, योगेश पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गुलाब पाटील, विश्वास पाटील, शामकांत पाटील, राजु चव्हाण, मनोज धाडिवाल, भालचंद्र पाटील, रतन कोळी, अनिल पाटील, निळकंठ पाटील रामलाल महाजन, राजु पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, मनोहर महाले, रवींद्र पाटील, पप्पु पाटील, सुभाष पाटील, बबलु पाटील, गोपी पाटील, विनोद राजपुत, प्रशांत गालफाडे, चेतन राजपुत, यश बिरारी, प्रशांत सोनवणे, भैय्या पाटील, भोला पाटील, ज्ञानेश्वर महाजन, विशाल पाटील व असंख्य कट्टर शिवसैनिक युवासैनिक पक्षप्रमुखांच्या समर्थनार्थ उपस्थित होते.