भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती चाळीसगाव महिला काँग्रेस तर्फे साजरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 20 रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती महिला काँग्रेस कमिटी तर्फे साजरी करण्यात आली.
भारतात संगणक क्रांती घडविणारे, १९४४ मध्ये २० ऑगस्ट रोजी जन्मलेले, राजीव गांधी भारताचे सहावे पंतप्रधान होते आणि वयाच्या ४० व्या वर्षी भारतीय पंतप्रधानांचे पद स्वीकारणारे सर्वात तरुण पंतप्रधान त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला होता,आज भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती निमित्त महिला काँग्रेस कमिटी च्या शहर अध्यक्षा अर्चनाताई पोळ बोलत होत्या यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले,यावेळी अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राहुल मोरे,शिवलाल साबणे साहेब,माजी आमदार ईश्वर भाई जाधव,जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी,माजी युवक काँग्रेस अध्यक्ष रवींद्र पोळ,आनंद गांगुर्डे,नितीन पवार,अमोल राऊळ,गफ्फार मलिक,युवक विधानसभा अध्यक्ष,मधू गवळी,अनिस शेख,भूषण पाटील,निलेश भडक,छोटू भाऊ गवळी,सुनील मोची,गजानन कासार,जयश्री ताई देशमुख,गिरजा बाई गवळी,भविता पोलाडिया,नीता गवळी,शुभांगी गवळी,मंगला बाई मिसाळ,छाया गवळी,कचरा बाई गवळी,लता तोरटे, गीता गोंडाळकर, छाया जोमदे, सारिका घटी,निशा निस्तारे, आरती मिसाळ,रेखा धनगर तसेच काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.