अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-भारतीय मानव अधिकार नवी दिल्ली महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष पदी सौ सविता कुमावत यांची निवड.
समाजकार्यात नेहमी पुढाकार घेणाऱ्या शहरातील महिला कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या सौ सविता कुमावत यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष ते थेट भारतीय मानव अधिकार नवी दिल्ली महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष पदी निवड म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे,जनसामान्यांच्या सुख दुःखात नेहमी सहभाग असणाऱ्या समाजसेविका सौ सविता कुमावत यांच्या निवडीनंतर बोलतांना यांनी सांगितले की पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून तळा गळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा प्रितेशजी राठोड यांच्या आदेशावरून ही निवड करण्यात आली असून यावेळी राष्ट्रीय महासचिव अभिषेक कुशवाह, राष्ट्रीय विधी सचिव ऍड सौ सुनेत्रताई राजपूत व संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीमुळे सौ सविता कुमावत यांच्यावर सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,