अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील भोरस फाट्याजवळ मोटार सायकल व स्विफ्टचा अपघात मोटार सायकल चालक गंभीर जखमी स्थानिकांच्या व मेहुणबार पोलिसांच्या मदतीने उपचारार्थ जखमींना चाळीसगाव येथे पाठविण्यात आले आहे.
भोरस फाट्याजवळ स्विफ्ट एम एच 01 बीयू 0911 व होंडा शाईन एम एच 19 डी एस 7733 यांच्यात अपघात झाला असून अपघातात मोटार सायकल चालक व सोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली असून स्थानिक लोकांनी तसेच मेहुणबारे पोलिसांनी जखमींना पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे रुग्णालयात पाठविले असून नेमक अपघात कश्यामुळे घडला ते आजुन कळाले नसून,घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली आहे.तसेच माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
