मध्यरात्री ड्रग्स क्रिस्टल एमडी (MEPHEDRONE) सह आरोपीला अटक,शहर पोलिसांची कारवाई….

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील मालेगाव रोड वरील नवीन पुलाच्या खाली मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत पोकॉ आशुतोष सोनवणे व पोकॉ नाना बच्छे यांनी रात्री एका संशयितास अटक करत पोलीस निरीक्षक यांना कळविले असता तात्काळ पोलीस निरीक्षक संदीप पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात अमली पदार्थ क्रिस्टल एमडी (MEPHEDRONE) सह घेतले आरोपीला ताब्यात पुढील कारवाई सुरू.
याबाबत वृत्त असे की पोकॉ आशुतोष सोनवणे व पोकॉ नाना बच्छे यांना माहिती मिळाली होती की एक इसम क्रिस्टल एमडी (MEPHEDRONE) चाळीसगाव येथील मालेगाव रोड वरून मालेगाव शहराकडे एक इसम घेऊन जात आहे ही माहिती मिळताच आरोपी शेख मोहम्मद आरीफ उर्फ शादाब मोहम्मद जमील वय 23 वर्षे रा. 4 था माळा, समरु बाग, तेली चाळ, हसन सेठ बिल्डींग, भिवंडी ता. ठाणे ह.मु. साठफुटी रोड, पॉवर हाऊस, जिरे बाबा दर्ग्याजवळ, मालेगांव यास सापळा रचून मालेगाव रोडवरील नवीन पुलाखालून दि 7 नोहेंबर 2023 रोजी 3 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास 60 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची, काळ्या रंगाची, पल्सर मोटारसायकल क्रमांक एम.एच.41 ए.एच. 7175 सह वीस हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचे पारदर्शक झिप पाऊच त्यामध्ये फिक्कट पिवळसर रंगाची क्रिस्टल एमडी (MEPHEDRONE) अंमली पदार्थ निव्वळ वजन केले असता 10.170 ग्रँम तसेच पाऊचसह वजन केले असता 11.680 ग्रँम मिळून आली असा एकूण 80 हजार 3 शे 40 रुपये किमतीचा एकुण मुद्देमाल आरोपी सह जमा केला आहे.कसून चौकशी केली असता बेकायदेशीर विक्री साठी जवळ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोकॉ आशुतोष सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ विनोद भोई हे करीत आहेत. सापळा पथक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, निवडणुक नायब तहसिलदार श्री संदेश निकुंभ, पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोहेकॉ राहुल भिमराव सोनवणे, पोहेकॉ संदीप रमेश पाटील,पोहेकॉ नितीन वाल्हे, पोना मुकेश पंढरीनाथ पाटील, पोना महेंद्र प्रकाश पाटील, पोना भुषण मांगो पाटील, पोकॉ रविंद्र निंबा बच्छे, पोकॉ ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पोकॉ महेश अरविंद बागुल, पोकॉ संदिप बाळासाहेब पाटील, पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच वजन मापाडी वजन मापाडी श्री हितेश जैन, फोटोग्राफर अनिकेत चंद्रशेखर जाधव यांचा सहभाग होता.