अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव प्रतिनिधी :- येथील मराठा समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू वर पालक सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 5 डिसेंबर रोजी शहरातील शिंदी समाज मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या भव्य मेळाव्याचे उदघाटन प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या मेळाव्यात जवळपास 170 ते 180 इच्छुक वधू वरांनी आपले परिचय करून दिले यात 130 वर 40 वधूंनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता, यामेळाव्यात जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक, औरंगाबाद अहमदनगर मुबंई, ठाणे या जिल्हातील वधू वरांचा देखील समावेश होता, मेळाव्या दरम्यान ज्या वधू वरांचे लग्न जमतील त्यांचे समाजाच्या वतीने मेळावा घेऊन लग्न लावून दिले जाणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली, मराठा कुणबी पाटील समाजाच्या वतीने दरवर्षी संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठया उत्साहात पाटणादेवी येथे साजरी करण्यात येती, याच कार्यक्रमात ज्या गरीब व गरजू वधू वरांचे लग्न जमले असतील त्यांचे लग्न लावून देण्याचा मानस आयोजकांनी मेळाव्यात व्यक्त केला. या मेळाव्याला इच्छुक वधू वरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम पाटील यांच्यासह ह.भ.प. कृष्ण महाराज, मराठा कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, महिला अध्यक्ष मिनाताई मांडे, माजी अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी नगरसेवक यशवंत मराठे, रविंद मांडे, हरिभाऊ गाढे, पवन शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाना पाटील, योगेश जाधव, केशव पाटील, ईश्वर पवार, सचिन पाटील, सचिन गायकवाड, सुधीर पाटील, प्रदीप मराठे, सचिन पवार, रणधीर जाधव यांच्यासह मराठा खानदेश कुणबी पाटील समाजाच्या समाज बांधवांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नाना पाटील यांनी केले तर आभार माजी अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी मानले.