महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य,भिडे यांच्यावर काँग्रेस ची कारवाईची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण आता तापले आहे. आता या प्रकरणी सकाळी 11 वाजत चाळीसगाव काँग्रेसने संभाजी भिडे यांच्या अटकेची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,संभाजी भिडे हे विकृत सदृश्य मनोवृत्तीचा गृहस्थ, शिव प्रतिष्ठान ह्या नावाखाली सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन तरुण मुलांना मार्गदर्शन करण्याच्या नावाने जातीयवादी बिजारोपण व तरुणाईच्या समोर देशाचा चुकीचा इतिहास सांगुन जाती जाती मध्ये तेढ कशी निर्माण करता येईल अशी भडक वक्तव्य करीत आहे. नुकतेच अमरावती येथे भारताचे राष्ट्रपिता ‘महात्मा गांधी यांच्या बाबत असे उदगार काढले की महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असुन त्यांचे वडील मुस्लीम समाजाचे होते. तसेच या पुर्वी या इसमाने महात्मा गांधी यांचा फोटो नोटावरुन काढुन टाकला पाहिजे असे वक्तव्य केले होते. म्हणुन जी व्यक्ती समाजा समाजात, जाती जातीत तेढ निर्माण होईल असे वक्तव्य महाराष्ट्रात फिरुन करतो आहे. यास कुणाचा पाठबळ आहे. ? त्यास मज्जाव का केला जात नाही, तरी सदर व्यक्तीवर आय पी सी १५३ व कायद्याखाली तसेच विविध कलम प्रमाणे त्वरीत कार्यवाही झाली पाहिजे. व अश्या जातीयवादी माथेफिरुचा पुरोगामी महाराष्ट्रात त्वरीत बंदोबस्त झाला पाहिजे. अशी मागणी या चाळीसगाव शहर काँग्रेस कमिटी तर्फे निवेदनाव्दारे नायब तहसीलदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आले यावेळी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल निकम,शहर अध्यक्ष रवींद्र जाधव,माजी आमदार ईश्वर जाधव,मंगेशकुमार अग्रवाल,प्रा सुवालाल सूर्यवंशी,मधू गवळी,ऍड वाडीलाल चव्हाण,रमेश शिंपी,विजय राजपूत,राहुल मोरे,गफ्फार शेख,आर जी पाटील,भगवान रणदिवे,एस इ बागुल,प्रदीप देशमुख,सागर जाधव,बापू चौधरी,गफूर अजीज,नितीन मोरे आदी उपस्थित होते.