कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात टाळेबंद(लॉकडाऊन)जाहीर करण्यात आले आणि त्याचा परिणाम म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने,आस्थापना,कार्यालय बंद आहेत.बारामती नगरपरिषदेने देशात टाळेबंदी लागू होण्याच्या आदीच खबरदारीचा उपाय म्हणून बारामतीतील व्यवहार बंद केले होते.या टाळेबंदीच्या काळात व्यवसाय धंदे बंद असल्याने बहुतांश लोकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे आणि येणाऱ्या काळात देखील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावं लागणार आहे.आशा परिस्थितीत नगरपरिषदेने त्यांच्या विविध व्यवसायिक संकुलातील गाळेधारकांना तसेच इतर खासगी गाळेधारक /बिगर निवासी मालमत्ताधाररकाकडून या काळातील भाडे,घरपट्टी किंवा इतर आकारणी करणे संयुक्त राहणार नाही.साधारण मार्च २०२० ते टाळेबंदी पूर्णतः उठेपर्यंतच्या काळातील सर्व कर भाडे माफ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा:ऍड सुधीर पाटसकर यांनी केली.बारामती नगरपरिषद नक्कीच या सर्व बाबींचा विचार करतील अशी अपेक्षा केली आहे.
Read Time1 Minute, 46 Second