Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महाराष्ट्र राज्य शासन व शालेय शालेय शिक्षण विभागाने अधिवेशनात सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षक यांचेसाठी तीन दिवसाची विशेष रजा मंजूर करून तसे आदेश पत्र महाराष्ट्र राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्नील कापडणीस यांनी निर्गमित केले आहेत.

0
1 0
Read Time5 Minute, 9 Second

एरंडोल(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन औरंगाबाद येथे 11ते13मार्च दरम्यान औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले असून या शिक्षकांच्या राज्य स्तरीय शिक्षण परिषद व अधिवेशन साठी महाराष्ट्र राज्य शासन व शालेय शालेय शिक्षण विभागाने अधिवेशनात सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षक यांचेसाठी तीन दिवसाची विशेष रजा मंजूर करून तसे आदेश पत्र महाराष्ट्र राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्नील कापडणीस यांनी निर्गमित केले आहेत. सदरील अधिवेशनात राज्यस्तरीय शिक्षकांच्या प्रश्नांसह विविध ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे असल्याचे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव राज्य महासचिव किशोर पाटील कुंझर कर यांनी कळविलेआहे.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ ही नोंदणीकृत संघटना असून राज्यातील शिक्षक हितासाठी संघटनेच्यावतीने होऊ घातलेल्या पहिल्या राज्य अधिवेशनात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या अधिवेशनासाठी राज्य शासनाने विशेष रजा मंजूर केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानत असतानाच शिक्षक हितासाठी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी तसेच शिक्षण क्षेत्रात सर्व स्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ,समता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील सर्व वरिष्ठांच्या मदतीने व शासनाच्या सहकार्याने तसेच सर्व लोकप्रतिनिधींच्या सोबतआपण कटिबद्ध असल्याचे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा शासनाने मंजूर करून संघटनेला पाठबळ दिले आहे ज्या शिक्षकांना अधिवेशनात सहभागी व्हायचे त्यांनी 7030887190 या क्रमांकावर संपर्क साधावा. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ सर्वस्तरीय शिक्षकांना सोबत घेऊन चालण्यासाठी असून राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांसाठी च्या पतसंस्था, सोसायटी यांच्या वतीने देखील महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या पहिल्या राज्यस्तरीय औरंगाबाद येथील अधिवेशनासाठी सहभागी शिक्षक बंधू भगिनी साठी विशेष कर्ज मंजूर करण्यात येणार असल्याची माहितीमहाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याचे महासचिव शिक्षक हितासाठी सतत धडपडणारे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर, राज्य समन्वयक पियू आरसू ड,राज्य नेते विलास इंगळे परमेश्वर साळवे अच्युत साबळे यांनी दिली.
राज्य शासनाने पहिल्या राज्यस्तरीय परिषदेसाठी सहभागी होणाऱ्या राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाचे विशेष रजा मंजूर करून दिल्याबद्दल राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने राज्य शासनाचे विशेष आभार मानले आहेत. तसेच जुनी पेन्शन योजनेसह वस्ती शाळा व विविध िक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात या अधिवेशनात ठराव करण्यात येणार असून राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी सहभागी व्हावे असे आवहन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने राज्य महासचिव किशोर पाटील कुं झर कर यांनी केले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: