Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महिंदळे प्रकरणाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी मा.कैलास गावंडे यांना निवेदन देवून कारवाई ची मागणी-समता सैनिक दल

0
0 0
Read Time2 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महींदळे येथील अन्यायग्रस्त बौद्ध बांधवांची भेट घेवून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेवून या विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा.कैलास गावंडे यांची चाळीसगाव येथील कार्यालयात आज समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक मा.धर्मभुषण बागुल यांनी भेट घेतली .या भेटीत महिंदळे प्रकरणात बौद्धांवर कसा अन्याय झाला ?
यावर सविस्तर चर्चा करण्यात आली .
१)50 पेक्षा जास्त लोक या हल्यात सामील असतांनाही फक्त चार लोक का आरोपी करण्यात आले .?
२) बौद्ध लोकांना जखमा असताना , मार लागलेला असताना व त्यांची जबाब देण्याची मनस्थिती नसताना त्यांचा जबाब नोंदवून घेण्याची घाई का करण्यात आली .?
3)घटना घडली त्याच वेळी गावातील वीज पुरवठा कसा बंद होता ?
४)बौद्ध समाजाचे 7 लोक जखमी असताना ,त्यांचेवर हल्ला करून त्यांनाच 307 कलम लावून आरोपी करण्यात आले ? हे कसे ?
अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली .
मागणी
१] या घटनेतील आरोपीवर 307 कलम लावण्यात यावे .
२]फिर्यादी चा व इतर जखमींचा पुरवणी जबाब घेण्यात यावा .
३]निरपेक्ष पणे चौकशी करून योग्य न्याय देण्यात यावा .
….अशी मागणी करण्यात समता सैनिक दला मार्फत करण्यात आली .
यावेळी लॉक डाऊन चे नियम पाळून फक्त तीन पदाधिकारी त्यात जिल्हा सचिव भाईदास गोलाईत व चाळीसगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव हे उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: