महीलेने रचला स्वत:चे अपहरणाचा व जबरी चोरीचा बनाव,खोटया तक्रारीचा झाला पर्दाफाश गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

1 0
Read Time4 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

पिंपरी(चिंचवड)(प्रतिनिधी)-दिनांक २०/०३/२०२१ रोजी पिंपरी पोलीस स्टेशनला बातमी मिळाली कि, साई चौक पिपरी येथे राहणा-या कुटुंबातील नवविवाहीत महीलेचे दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या तोंडाला गुंगीच्या औषधाचा रुमाल लावुन बेशुध्द करुन राहते घरातुन अपहरण करुन घेवून गेले व त्यांच्या अंगावरील १,१५,०००/- रुपये किमतीचे दागीने जबरदस्तीने काढुन घेवून फ्रेंडशिप गार्डन सिंहगडरोड, पुणे येथे सोडुन दिले. अशी बातमी मिळताच
सदरची घटना गंभीर स्वरुपाची असल्याने तात्काळ वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीती कळविण्यात आली. मा.पोलीस
आयुक्त कृष्णप्रकाश यांनी गुन्हे शाखेला अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. गुन्हे शाखा युनिट २ कडील
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड
यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला.तपासामध्ये फिर्यादी महीला वारंवार वेगवेगळी
माहिती देत असल्याने तपास करतांना अडचणी येत होत्या.सदर महीलेकडे वारंवार कसोटीने विचारपुस करुन तिला ज्या मार्गावरुन घेवून गेल्याची शक्यता होती त्या मार्गाची व फ्रेंडशिप गार्डन, सिंहगड रोड परिसराची पाहणी केली.व तांत्रिक तपासाचे आधारे व नमुद परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत असतांना सदर महीला ही राहते परिसरात फिर्यादीमध्ये नमुद केलेली वेळी पायी चालत जात असल्याचे दिसुन आले त्यावेळी यामध्ये काहीतरी बनाव असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. दिनांक २४/०३/२०२१ रोजी सदर महीलेस गुन्हे शाखा युनिट २ कार्यालयात आणुन तिला विश्वासात घेवून अत्यंत सचोटीने व कुशलतेने विचारपुस केली असता तिचे सासरी मन रमत नव्हते व सासरी नांदण्याची तिची मानसिकता नसल्याने अपहरणाचा खोटा बनाव करुन , जबरी चोरीची घटना खरी असल्याचे भासविण्यासाठी तिने स्वत:च अंगावरील सोन्याचे दागीने त्यामध्ये हातातील दोन सोन्याच्या बांगडया, दोन सोन्याच्या अंगठया असे शौचालयाचे भांडयात टाकून दिले तसेच अँड्राईड मोबाईल शौचालयाचे खिडकीतुन मागील बाजुस अडगळीत फेकुन दिला.सदरचा गुन्हा गंभीर व संवेदनशिल असल्याने गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुन्हा घडलेपासुन रात्रंदिवस सातत्याने व कुशलतेने तपास करुन सदर गुन्हयामध्ये फिर्यादी महीलेने बनाव करुन खोटी फिर्याद दिल्याचे उघडकीस आणुन सदर गुन्हयातील सोन्याचे दागीने व मोबाईल फोन जप्त केला. सदर महीलेस पुढील कारवाईसाठी पिंपरी पोलीस ठाणेकडे हजर केले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री आनंद भोईट, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट २ चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक नंदकुमार कदम, पोलीस अंमलदार नामदेव राऊत ,प्रमोद वेताळ, उषा दळे, जयवंत राऊत, यांचे पथकाने केली
आहे.

Happy
Happy
33 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
33 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
33 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.