Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मागील 50 ते 55 वर्षापासून हिंदू दफनभूमी वहिवाट असताना नगर परिषद अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी दफन भूमी करून न दिल्यामुळे त्याच्याविरोधात आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा रमापती कन्नड समाजाच्यावतीने इशारा.

0
3 0
Read Time4 Minute, 2 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव
दौंड-अनुसूचित जातीचे (मातंग समाज) मागील गायरान जमीन गट क्रमांक 1/अ मधील हिंदू स्मशान साठी तसेच लिंगायत समाजाचा त्यास गटातील जमीन नगरपालिकेने नावावर करून लाखो रुपये खर्च करून विकसित केली परंतु मागील पन्नास ते साठ वर्षापासून मातंग समाजाची हिंदू दफनभूमी अंत्यविधी करीत असणारी त्याच गटातील जमीन नगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधी फक्त मातंग समाजाची मते घेऊन फसवणूक केली निवडणूक काळात मोठे मोठे आश्वासन जाहीरनामे घेवून मागासवर्गीयांनकडून मते मागतात परंतु आमच्या मतावर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक व गटनेते सभापती उपसभापती अशी आणि पद भूषविणारे राजकीय लोक अंत्यविधीसाठी दफनभूमी मध्ये येतात तसेच समाजाकडून तशी मागणी व पाठपुरावा मागील अनेक वर्षापासून करत असताना नगरपालिका प्रशासन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष दोन्ही गटाचे गटनेते नगरसेवक हे जाणीवपूर्वक करीत नाही आणि दुसरीकडे ख्रिश्चन दफनभूमी मुस्लिम दफनभूमी पाहणी केली तर आपणास वस्तुस्थिती माहित पडेल की फक्त जातीय नात्याने आम्ही मागास अनुसूचित जाती चे असल्यानेच हिंदू दफनभूमी मागील पन्नास ते साठ वर्षात एकही रुपया खर्च न करणारी नगरपालिका पहिलीच असेल की वहिवाट असताना, मागणी असताना सुशोभीकरण वॉल कंपाऊंड बैठक व्यवस्था लाईट रस्ता अशी सोय नसणारी महाराष्ट्रातील एकमेव दफनभूमी असलेल्या सर्वस्वी वरील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत जर आजपासून एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठपुरावे करून गायरान जमीन गट क्रमांक 1/अ मधील 80 गुंठे जमीन नगरपरिषदेच्या नावावरून जर त्या ठिकाणी योग्य निधी टाकून काम चालू नाही केल्यास तसेच मातंग समाजाला न्याय नाही दिल्यास वरील सर्व लोकप्रतिनिधी नगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन उपोषण रास्ता रोको किंवा त्यापेक्षा अधिक उग्र असे आंदोलन करण्यात येईल येईल या काळात काही अनिष्ट घटना घडल्यास त्यास सर्वस्वी पणे हे आपणास लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहील असे पांडुरंग गडेकर यांनी म्हटले आहे हे निवेदन दौंड नगरपालिका दौंड पोलीस स्टेशन दौंड तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदन देताना रमापती कन्नड समाजाचे सुरेश लक्ष्‍मण येरमाळे (अध्यक्ष), पांडुरंग गडेकर (उपाध्यक्ष), धरम बनसोडे (सचिव), तम्मा पाळीम,रवि लांडगे शिवकुमार संगोपन ,अक्षय मोरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: