Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मान्सूनपूर्व पूर नियंत्रण प्रभाग दौरा,प्रभागातील प्रमूख प्रश्न लवकरात लवकर सोडवणार-नगरसेवक सचिन चिंचवडे

0
2 0
Read Time2 Minute, 29 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चिंचवड प्रतिनिधी सनी घावरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर, महापौर सौ. माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, सन्मानीय नगरसेवक आणि इतर अधिकारी, मा. उपमहापौर नगरसेवक श्री. सचिन चिंचवडे व माजी सत्तारूढ पक्षनेते व माझे मागर्दर्शक श्री. शाम वाल्हेकर यांच्याकडून मान्सूनपूर्व पूर नियंत्रण प्रभाग दौरा करण्यात येत आहे. प्रभागातील सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्यासाठी ही पाहणी करण्यात आली.
सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे याच संधर्भात आपल्या प्रभागामधील सर्व प्रश्नांची, सोयींची पाहणी आवश्यक होती. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व आम्ही प्रभागाची पाहणी करून पाठपुरावा घेतला.
आयुक्तांच्या पाहणी दरम्यान आयुक्तांसमोर प्रभागातील विविध समस्यां मांडून खालील समस्यांवर चर्चा केली
पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पाणी साचणे
गटर चोकअप होणे
कचरा साचून दुर्गंधी पसरणे
कोरोनाच्या संधार्बत पुढील उपाययोजनांवर चर्चा केली
प्रभागातील विकास कामे सुरु असताना अंडरग्राउंड केबल खराब झालेल्या आहेत पावसाळ्यात या केबलचा लोकांना वीज जाऊन नाहक त्रास होऊ नये यासाठी या केबल लवकरात लवकर पूर्ण बदलून घेण्यात याव्यात या संधार्बत आयुक्तांकडे मागणी केली आहे.

प्रभागातील प्रमुख प्रश्न लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी मी सदैव तत्पर राहून सर्व कामे पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे,प्रभाग क्रमांक-१७ चे नगरसेवक सचिन चिंचवडे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: