Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

0
0 0
Read Time1 Minute, 32 Second


जळगाव, दि. 11 – सन 2019-2020 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असून त्यातच 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण आहे. त्यामुळे नवीन वाहने खरेदी करणाऱ्यांची संभाव्य गर्दी आणि नवीन वाहन नोंदणीसह गुढीपाडव्याच्या सणाला वाहन ताब्यात मिळण्यासाठी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा ओघ लक्षात घेता, वाहनधारकांच्या अडचणी दुर करणे. शिवाय 31 मार्च, 2020 रोजी संपत असलेल्या आर्थिक वर्षातील नियोजित महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार 21 मार्च, रविवार 22 मार्च, बुधवार 25 मार्च (गुढीपाडवा) शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च, 2020 या सर्व शासकीय तसेच सार्वजनिक सुट्यांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव नियमितपणे सुरू राहणार आहे.
तरी सर्व वाहन खरेदी करणारे वाहन धारक, वाहन प्रतिनिधी व सर्व संबंधितांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: