मेहुनबारे गावात घाणीचे साम्राज्य,ग्रामपंचायत फक्त नावाला का-विजय देशमुख

0 0
Read Time2 Minute, 12 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील मेहुनबारे या गावात डेराबर्डी ते पोलीस स्टेशन पासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत पूर्णपणे रोडच्या उजव्या व डाव्या साईडला रोड पट्ट्यांच्या बाजूला असलेल्या गटारी तुडुंब भरलेल्या आहेत आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग लागला आहे मात्र ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे?
मेहुनबारे हे गाव धुळे चाळीसगांव मुख्य रोडवरील गाव असून या गावातील मुख्य रस्त्यांच्या कड्याला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून नाल्या तुडुंब भरल्या आहेत अक्षरशः पावसाच्या पाण्यात तर पोलीस ठाण्याच्या समोरच गुढघ्या इतके पाणी साचते या साचलेल्या पाण्यामुळे विविध आजार डोके वर काढत असतात,डासांचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत संपूर्ण गावात प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य झाले असून वारंवार नागरिकांच्या तक्रारी वरून सुद्धा ग्रामपंचायत लक्ष देण्यास तयार नसल्याने संभाजी सेनेचे तालुका उपाध्यक्ष विजय देशमुख यांनी जर लवकरात लवकर गावात साफसफाई झाली नाही तर 25 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत मध्ये कचरा फेक आंदोलन करणार असल्याचे पत्र ग्रामपंचायत ला दिले असून पत्रावर कृष्णा कोळी,दौलत सूर्यवंशी,विलास गजरे,भगवान गजरे,फिरोज पहेलवान आदींच्या सह्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.