Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवापूर येथे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड उद्घाटन सोहळा संपन्न

0
1 0
Read Time5 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

शिवापूर(प्रतिनिधी)-सध्याच्या संगणकीय युगात डिजिटल तंत्रज्ञान हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. वेळेची बचत व अचूकता या गोष्टी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज सोप्या होत आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रातसुद्धा तंत्रज्ञानामुळे नवनवीन संकल्पना सहजगत्या विद्यार्थ्यापर्यत पोहोचविणे सुलभ झाले आहे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती प्राथमिक शालेय जीवनातच व्हावी आणि तंत्रज्ञानाची कास धरून उद्याचे सर्वगुणसंपन्न भावी नागरिक तयार व्हावेत, हा हेतूने काही सामाजिक संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहेत तसेच समाजाच्या उन्नतीसाठी आपले योगदान देत पुढे येऊन मदत करत आहेत ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
आज जिल्हा परिषद शाळा शिवापूर शाळेस रा स्व संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातुन Adisoft Technologies चे संचालक सन्माननीय श्री. अजय प्रभु साहेब यांच्या देणगीतुन शाळेसाठी इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड भेट देण्यात आला. रा. स्व. संघ जनकल्याण समिती प.महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह श्री. विनायकराव डंबीर, AFY कंपनीचे संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ पुणे संस्थेचे विश्वस्त आणि स्वानंद जनकल्याण चे अध्यक्ष सन्मा.श्री.सुधीर काळकर, रा.स्व. संघ पुणे महानगर सह संपर्क प्रमुख व स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान सचिव सन्मा. श्री.रविंद्र शिंगणापुरकर, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. आप्पा नवघणे, श्री उदय पुरंदरे(काका) शिवापूर गावचे सरपंच श्री. सतीश (बापू) दिघे, उपसरपंच श्री. राजू सट्टे, माजी उपसरपंच मा. संजय अण्णा दिघे, श्री. उमेश दिघे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. स्वाती ताई शिंदे, सदस्य सौ. पल्लवी दिघेश्री. राजेंद्र दिघे, पत्रकार श्री. किरण दिघे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय होनराव मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांचे शुभहस्ते इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड चे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
शाळेतील पदवीधर शिक्षक आणि शिवापूर केंद्राचे केंद्रसमन्वयक मा. श्री. हनुमंत जाधव सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत डिजिटल बोर्ड विद्यार्थ्यांच्या शिकण्यात किती उपयुक्त आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. उदय पुरंदरे (काका) यांनी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याची ओळख करून दिली.
उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेत सुरु असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.तसेच या डिजिटल बोर्डाचा प्रभावी वापर करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मा. सुनिल कुऱ्हाडे साहेब यांनी व्हिडिओ काॅन्फरसद्वारे मोलाचे मार्गदर्शन करुन देणगीदारांचे अभिनंदन केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका मा. मंगल देसाई मॅडम, मा. अनिता वानखडे मॅडम, कल्पना थोरात मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
समारोपप्रसंगी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री. राहुल गायकवाड सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. हा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: