अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील लिंगाळी रावणगाव रोड मसनेरवाडी जवळ भीषण अपघात झाला त्या अपघातात एक ठार व एक जण गंभीर जखमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेच्या पोत्यानी भरलेला मालवाहतूक करणाऱ्या ट्रक क्र MH 42 B 9931 व होंडा शाइन क्र MH 42 AY 2079 या गाडीचा समोरासमोर अपघात होऊन यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून जखमी झालेल्या व्यक्तीला दौंड शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर माहिती अशी की ट्रक चालक दौंड शुगर कारखान्याकडून दौंडच्या दिशेने निघाला होता तर दुचाकी वर असलेले आई व मुलगा दौंड कडून आपल्या गावे हिंगणी बेर्डी ता. दौंड या ठिकाणी निघाले होते पण लिंगाळी हद्दीतील मसनेरवाडी ओढ्याजवळ वळणाला समोरासमोर धडक होऊन यामध्ये नितीन गौतम माने वय वर्ष 20 मुलाचा मृत्यू झाला असून आई सुलाबाई गौतम माने वय वर्षे 45 गंभीररीत्या जखमी झाले आहे. सदर मालवाहतूक ट्रक शेजारील ओढयात मध्ये जाऊन कोसळला आहे . अपघातानंतर ट्रकचालक फरार असून अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहे.