70 कोटींचा निधी आणला “आभार” मात्र,कामाचा दर्जा टिकविण्यासाठी ‘टक्केवारीला’ आळा घाला.. बस्स

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव(विशेष)-जवळपास गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या 9 रस्त्यांसाठी 70 कोटी रुपयांचा निधी ग्रामसडक योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाने मिळाला असून नक्कीच याचा फायदा दळणवळणासाठी होणार याबाबद्दल प्रथमतः आपले आभार.भरघोस निधी जिल्ह्याला मिळवून दिल्या बद्दल आम्ही जिल्हावासी आपले कायम ऋणी राहू पण रस्ते उत्कृष्ट दर्जाचे करा.
आपण पत्रकार परिषदेत ही 70 कोटी निधीची घोषणा केली कामाला पण लवकरच सुरवात होईल,पण नुसतं निधी मिळवून आपले कर्तव्य मात्र संपले नाही तर जबाबदारी सुरू झाली आहे. हे पण आपण लक्षात ठेवायला हवे. निधी साठी वर्षानुवर्षे वर्ष वाट पाहावी लागली म रस्ते पण वर्षानुवर्षे टिकले पाहिजे.टक्केवारीचा खेळ थांबविण्यासाठी आपणास पुढाकार घेणे गरजेचे आहे.ज्याला पण काम द्याल त्याला सल्ला पण द्या की टक्केवारी कोणालाच द्यायची नाही.तर जनतेला उत्कृष्ट दर्जाचे रस्ते द्यायचे आहे.जेणे करून आपण आणलेला भरघोस निधी रस्त्याचे भरगच्च काम करेल नाही तर आम्ही जळगावकारांची स्वप्ने तर धुळीत मिळाली आहेच.आपल्या जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा आपण पाहत आहात पण आता गावांना जोडण्यासाठी आपण आपली जबाबदारी स्वीकारत पुढाकार घेऊन 70 कोटी रुपयांचा जो निधी आणला आहे.त्या 70 कोटींच्या माध्यमातून आपल्या त्या रस्त्यांच्या कामाच्या उत्कृष्ट दर्जातून आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध करून द्या आणि सुरुवात करा टक्केवारीमुक्त रस्त्यांची.जिल्ह्याला लागलेली टक्केवारीची भ्रष्टाचार रुपी कीड संपवून.उत्कृष्ट रस्ते पहायची संधी आपण आपल्या कार्यकाळात आम्हा जिल्हावासीयांना मिळू द्या एवढी अपेक्षा आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले नेते नितीन गडकरी यांनी आणलेली महमार्गाची समृद्धी आपण आपल्या जिल्ह्यातील गावागावात घेऊन येणार अशी आशा करतो.बस एवढे आठवण असू द्या “ना खाऊंगा ना खाने दूंगा”