राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमापूजन

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव( प्रतिनिधी)-राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय महासंघाच्या वतीने चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या ताईसाहेब अनिता शिंदे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकारी यांनी देखील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून जय जयकार केला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ चे चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे, चाळीसगाव शहर उपाध्यक्ष कैलास दादा पाटील, शिवसेनेच्या अनिताताई शिंदे, महिला शहराध्यक्ष रत्नाताई पाटील,शहर संघटक रवींद्र पाटील, गोविंदा चव्हाण सर, पत्रकार योगेश मोरे, घनश्याम सोनार, दिलीप अहिरे आधी समाज बांधव उपस्थित होते.