राज्यातील जिल्हा परिषदशिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार

Read Time17 Minute, 47 Second

अभ्यास गट स्थापन, सर्व शिक्षक संघटना व सर्व शिक्षकांची मते जाणून घेणार अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांची भूमिका.
अभ्यास गट समोर कुंझरकर यांचेसह सर्व संघटनांनी म्हणणे मांडून दिले निवेदन.
10 फेब्रुवारीला पुणे येथील सभागृहात झाली दिवसभर चर्चा.

त्रुटी दुरुस्तीसह आदर्श शिक्षक बदली धोरणासाठी अभ्यास गट शासन व संघटना सकारात्मक असल्याची किशोर पाटील कुंझर कर यांची माहिती.

पुणे: जिल्हा परिषद शिक्षकांचे संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या अंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली धोरणासंदर्भात राज्य शासनाने अभ्यास गट स्थापन केला असून या अभ्यास गटाद्वारे राज्यातील जवळपास सर्व शिक्षक संघटनांचे राज्याध्यक्ष राज्य सचिव यांची शासनाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली.यावेळी राज्यभरातील शिक्षक संघटनांची राज्याध्यक्ष राज्य सचिव व प्रतिनिधींमध्ये अभ्यास गटासोबत दिवसभर चर्चेअंती यंदाही बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच व्हाव्यात यावर संघटना प्रतिनिधींची अभ्यास गटाचे एकमत झाल्याची तसेच अभ्यास गटाने उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या बदली धोरणासंदर्भात ची मते मागण्यांची निवेदने स्विकारुन सभागृहात सखोल चर्चा केली ऑनलाईन बदली प्रक्रिया बाबत जवळपास 400 हून अधिक सुधारणा सभागृहातील सहभागी संघटनांनी सुचविल्या असून बऱ्याच मुद्द्यांवर एकमत केल्याचे आणि बिहार पंजाब मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक आदर्श बदली धोरण तयार करण्याचा निर्धार अभ्यास गटानेकेल्याची आणि राज्यभर विभागणी आहे दौरे करून विविध शिक्षक संघटनांची व सर्वसामान्य शिक्षकांची मतेही जाणून घेणार असल्याची व व त्यासाठी एक अभ्यास स्वतंत्र ईमेल आयडी abhyasgat@gmail.com. या नावानेविकसित केल्याची आणि या इमेलवर शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक संघटना आपल्या प्रोसिडिंग सह आपली मते नोंद करू शकतो तसेच सर्वसामान्य शिक्षकही आपली मते व सद्यस्थितीतील बदली प्रक्रियेतील त्रुटी विषयीमाहिती सध्याचा शासन निर्णय काय आहे त्यामध्ये आपण काय बदल करू शकतो व हा बदल करून आल्यानंतर काय फायदा होईल या स्वरुपात पाठवू शकतो अशी माहिती राज्यस्तरावरील पुणे येथे झालेल्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिवकिशोर पाटील कुंझरकर यांनी दिली.
शासनाने गठीत केलेल्याजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणा संदर्भातील अभ्यास गटात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद भाप्रसे हे अध्यक्ष असून सदस्य म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक बावडा रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप हळदे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते काम सांभाळतआहेत. राज्यस्तरीय बैठकीच्या वेळेस आलेल्या सर्व शिक्षक संघटनांना राज्याध्यक्ष राज्य सचिव व त्यांचे प्रतिनिधी यांना दुपारचे जेवण पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आल्याचे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.
सर्व जिल्ह्यांमध्ये बदली पूर्वी रोस्ट राज्यात करावेत संवर्ग 1 आणि 2 साठी बदली हवी की नको हा विकल्प देण्यात यावा. आंतरजिल्हा बदली केंद्रांतर्गत बदली जिल्हास्तर समुपदेशन बदली माहिती भरणे आंतर विद्यार्थी व शिक्षक हित पोर्टल वर रिक्त जागा ठेवणे अवघड भागातील शिक्षकांना प्राधान्य द्यावे राज्य रोस्टर एकच असावे राज्य शासन आदर्श शिक्षक राष्ट्रीय आदर्श शिक्षक जिल्हा परिषद आदर्श शिक्षक उत्कृष्ट शिक्षक यांना बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक मध्ये घेण्यात यावे , यासह जवळपास 400 मुद्द्यांवर सहभागी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापली मुद्दे मांडले. विभागवार दौऱ्यानंतर अभ्यास गट आपला अहवाल शासनाकडे सादर करणार असून त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली चे धोरण अधिकृत जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे ,महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाचे राज्य अध्यक्ष बबनराव आटोळे,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र म्हासदे,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कूंझरकर ,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष इल्लाहोजुद्दिन फारुकी, अब्दुल्ला बहकिम,महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री प्रसाद हि. पाटील दिलीप भोई,महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री राम परबत, डी एन जपे,इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर, आबा लोंढे, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अमित निकम अमोल साळवे, शिक्षक सहकार संघटना राज्याध्यक्ष संतोष पित्तलवाड ,राज्य कार्याध्यक्ष एस के सुतार, ओबीसी शिक्षक संघटनेचे संदीप पाडळकर,शासन मान्य प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई चे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील महादेव सरोदे,महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष काशिनाथ भोईर राजू बनसोडे महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस शिक्षक प्रतिनिधी सभेचे राज्य अध्यक्ष श्री कालिदास माने राज्य कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ठाकरे, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद, अध्यक्ष महेबुब तांबोली, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वयाचे मधुकर काठोळे ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे राज्य सरचिटणीस केशवराव जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ दोंदे गटाची राज्याध्यक्ष देविदास बसवदे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे उदय रा शिंदे,राज्य सरचिटणीस विलास द.कोंबे ,खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे राज्य नेते सनिदेवल जाधव राज्याध्यक्ष गोविंद पाटील सोळंकी, जुनी पेन्शन हक्क संघटना राज्य उपाध्यक्ष शैलेश पाटील राज्य सरचिटणीस गोविंदराम उगले, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष एम ए गफार,एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच चे राज्याध्यक्ष लक्ष्मण नरसाळे, राज्य पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष जब्बार दगडूशेठ विनोद विलास पवार,डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री लक्ष्‍मण नेव्हल,अनंत मिटकरी, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मो.हनीफ शेख उपाध्यक्ष जावेद खान, जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष शालिनी बारसागडे, अरुणा उदावणत,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे आनंद सोनकांबळे महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश पांडुरंग जाधव , शिक्षक संघ वाल्मीक पाटील, एस के चौधरी मोतीराम पवार निवृत्‍ती तळपाडे,समता शिक्षक परिषदेचे सुर्यकांत कचरू गरुड संतोष विश्वनाथ गव ई,बदली हवी संघटनेचे संजय गायकवाड,
महाराष्ट्र राज्य पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीचे सुनील बळीराम राठोड पल्लवी रमेश माने रायगड श्रद्धा बाळासाहेब चव्हाण,यांचा जवळपास 40 हून अधिक शिक्षक संघटनांच्या राज्य प्रतिनिधींनी चर्चेमध्ये सभागृहात सहभाग घेतला .अभ्यास गटाद्वारे सर्वांची मते विचारात घेतली जात असून सकारात्मक चर्चा होत असल्याच ने यावेळेस शिक्षकांमध्ये उत्साह व आनंद असून बदल्यांबाबत ची भीती काही प्रमाणात दूर होत असल्याची भावना शिक्षक संघटना राज्य समन्वय समिती राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझर् कर यांनी व्यक्त केलीव सुधारित बदली धोरणामध्ये विद्यार्थी हित व शिक्षक हीत व सर्वसामान्य शिक्षकांचे हित जोपासले जावे असे म्हटले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीच्या सर्व प्रतिनिधींची बैठकीच्या आदल्या दिवशी बदली धोरण व इतर प्रश्नांच्या संदर्भात सर्वसमावेशक बैठक अर्जुनराव साळवे यांच्या अध्यक्षतेखालीझाली होती.राज्यभरातून राज्य समन्वयक किशोर पाटील कूंझर कर यांच्याकडे आलेल्या सर्व दोनशेहून अधिक बदली संदर्भात प्रश्नांचे मांडणी राज्य समन्वयक किशोर पाटील कूंझरकर यांनी केली.
10 फेब्रुवारी 2020 रोजी बदली धोरणाचा अभ्यास गटासमोर प्रभावीपणे मुद्दे मांडल्याबद्दल राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे बबनराव आटोळे अरुणराव जाधव , एम ए ग फार ,इल्लाहोजुद्दी न फारुकी, विजय समुद्रे आदींनीशिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझं रकर यांचे काम, अभ्यास मांडणी व धडपड प्रेरणादायी असल्याचे म्हटले.
अभ्यास गटाला अधिक काम सोपे व्हावे म्हणून व सर्व शिक्षकांचे प्रश्नांचा विचार व्हावा म्हणून दिलेल्या ई-मेल वर सर्वांनी आपल्या भावना कळवाव्यात असे शिक्षक संघटनांच्या वतीने राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी सकाळी निवड क शिक्षकांसोबत चर्चा केली. यावेळी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचा इतर ग्रामसेवक,तलाठी या
प्रमाणे एकच शिक्षकांचामहासंघ असावा जेणेकरून कुठलाही प्रश्न एकमत होऊन लवकर शासनदरबारी प्रभाव करून प्रश्न सुटतील अशी निकोप निस्वा र्थं प्रामाणिक भावना शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केली
पुणे येथील सभागृहातील चर्चा गंभीर व शांततेत व्हावी यासाठी उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल बैठकीच्या सुरुवातीलाच जमा करून घेण्यात आले होते तसेच बैठक सुरू होण्याच्या अगोदरच सर्व संघटनांची निवेदने अभ्यास गटात कडून किशोर कुलकर्णी यांचेमार्फतजमा करण्यात आली होती. यामुळे विनाखंड सभागृहातील चर्चा गांभीर्याने प्रदीर्घ काळ सुरू राहिली व बरेचसे मुद्दे समोर आले.
दरम्यान शासनाच्या नवीन बदली धोरण कसे असेल याबाबत राज्यभरातील शिक्षकांमध्ये चिंता लागून राहिली आहे.
फोटो caption
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणासंदर्भात पुणे येथे आयोजित शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीतअभ्यास गटाच्या समोर सर्वसामान्यांचे शिक्षक हित व विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून बदली धोरण असावे, ऑनलाइन पद्धतीचाच स्वीकार ह्वावा यासंदर्भात आयोजित केलेल्या मीटिंग मध्ये आपली भूमिका मांडताना व अभ्यास गटाचे लक्ष वेधतना शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर व राज्यभरातून आलेले प्रतिनिधी .

राज्यातील समन्वय समिती तसेच विविध शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना- किशोर पाटील कुंझरकर .
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post चाळीसगाव येथे महान क्रांतिकारी जगत् गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी
Next post जेसीआय चाळीसगाव सिटी अध्यक्ष जेसी मुराद पटेल सचिवपदी जेसी हर्षल चौधरी यांची निवड
error: Content is protected !!
%d bloggers like this: