अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) — चाळीसगाव शहरासाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे. चाळीसगावचे सुपुत्र रामेश्वर बाबुलाल चौधरी यांची सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्था या प्रतिष्ठित संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीची घोषणा श्री श्री श्री १००८ मंडलेश्वर श्री दत्तात्रेय दहिवाळ महाराज यांच्या आशीर्वादाने आणि संस्थेच्या डॉ. सारिका ताई नागरे (प्रदेशाध्यक्षा), संदीप भाऊ मानकर (प्रदेशाध्यक्ष), राजेंद्र कुलथे (प्रदेश सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या निवडीत संपर्क प्रमुख संजय तळेकर, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष दादा सोनार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून, सुनील दादा सोनार (मीडिया प्रमुख अध्यक्ष) यांच्या माहितीनुसार ही घोषणा अधिकृतरित्या करण्यात आली.
रामेश्वर बाबुलाल चौधरी यांचे सामाजिक कार्य, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि एकनिष्ठ सेवाभाव यामुळे ही निवड सर्व स्तरांतून स्वागतार्ह ठरली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
