संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- विधानसभा मतदारसंघातून प्रचंड अशा विक्रमी मतांनी विजय झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांचा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांन मार्फत विर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे ब्रांझ शिल्प देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
चाळीसगाव येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक 27 जानेवारी रोजी करणी सेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी हा सत्कार केला असून यावेळी समाजाच्या विविध प्रश्न आणि समस्यांवर देखील आमदार चव्हाण यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अभयसिंग राजपूत, विरेद्रसिंग(टोनू) राजपूत, दिलीपसिंग घोरपडे, प्रशांतबापू राजपूत, सिद्धार्थसिंग राजपूत, निलेशसिंह राजपूत, पप्पु राजपूत, तसेच भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते.
