अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक तालुका अध्यक्षपदी प्रकाश पाटील तर युवक तालुका उपाध्यक्षपदी ललित सोनवणे यांची निवड करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,अखिल भारतीय मराठा महासंघ चे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय विश्राम गृह येथे 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक तालुका अध्यक्षपदी प्रकाश पाटील तर तालुका उपाध्यक्षपदी ललित सोनवणे यांची निवड करण्यात आली. जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे,महिला जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिता शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर बैठकीला जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते .या निवडीमुळे प्रकाश पाटील व ललित सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांचा त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
