संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील उंबरखेड येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहे,26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरपंचांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले असून या सोबतच शालेय विद्यार्थ्यांना मरहुम लियाकत पठाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप देखील करण्यात आले.
उंबरखेड येथील जिल्हा परिषद शाळेत पावसाळ्यात पावसामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या चिखलामुळे कसरत करत वर्गात जावे लागत असत यामुळे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अंजुम ताई पठाण यांनी वारंवार ग्रामपंचायत येथे पाठपुरावा करत सरपंच उज्वला ताई पाटील यांच्या सहकार्याने मंजुरी मिळवत सदर काम पूर्ण करून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून लोकार्पण करत विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त केले आहे.तसेच ग्रामपंचायत सदस्या अंजुम ताई पठाण यांनी त्यांचे पती मरहुम लियाकत पठाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप देखील केले.यावेळी बोलतांना अंजुम ताई पठाण यांनी सांगितले की ज्या प्रामाणिक हेतूने त्यांचे पती समाजसेवा करत होते,त्याच प्रमाणे निस्वार्थ पणे लोकहिताची कामे करत राहणार असून त्यांच्या समाजसेवेच्या कार्याला पुढे घेऊन जात त्यांना खरी श्रध्दांजली अर्पण करणार आहे.
यावेळी सरपंच उज्वला ताई पाटील,माजी सरपंच उदयसिंग पाटील,संजय पाटील,उपसरपंच किरण पाटील,पोलीस पाटील अर्चना ताई पाटील,संदीप पाटील,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष फिरोज पठाण,पत्रकार गफ्फार शेख,पत्रकार शांताराम निकम,सामाजिक कार्यकर्ते जहीर अली,शफी पठाण,राजू पठाण,आरिफ सय्यद,आरिफ मुल्ला, भैय्या पठाण,पत्रकार अजगर मुल्ला,मुबिन पठाण, मुस्तकीम सय्यद,युनूस मुल्ला,बहादुर पठाण या सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अनिस अहमद,इफ्तेकर सर, आफ्रीन मॅडम,फइम सर यांनी केले होते.
शेवटी इफ्तेकार अहमद सरांनी मातृभाषेत शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना जास्त लाभ मिळत असतो घरी जी भाषा बोलली जाते त्याच भाषेत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे.आज अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश करून घेत असतात पण घरी बोलली जाणारी भाषा ही इंग्रजी नसते तर ती मराठी किव्वा हिंदी असते तरी दर्जेदार शिक्षण हे आपल्या मातृभाषेत असलेल्या मराठी,उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मध्ये देखील मिळत आहे.असे मनोगत व्यक्त करत त्यांनी आलेल्या मान्यवरांचे शाळे तर्फे आभार मानले.
