संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव (प्रतिनिधी) :-येथील पाटील वाड्यातील रहिवाशी तथा ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) यांना नुकतेच राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. शहरातील पाटील वाडा खोल गल्ली येथे शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने दि.२२ रविवार रोजी झालेल्या एका कीर्तनात दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संस्थेचे राष्ट्रीय सचिव ह.भ.प. वाल्मीक महाराज (सटाणा) यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदर पुरस्कार हा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना या संस्थेतर्फे दर वर्षी वितरित करण्यात येतो, अशाच प्रकारे येथील ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) हे अनेक वर्षांपासून चाळीसगावसह परिसरात वारकरी सांप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे, त्यांच्या कार्याची दखल दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संस्थेने घेऊन त्यांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेने भर कीर्तनात केलेल्या सन्मानाबद्दल ह.भ.प.ए.बी. पाटील यांनी या ससंस्थेचे आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान ह.भ.प.ए.बी. पाटील यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.