रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) दौंड शहर व तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी निवड….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक निकाळजे यांच्या हस्ते व महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा बाळासाहेब पवार पुणे जिल्हाध्यक्ष विकास साळवे, यांच्या मार्गदर्शनात तसेच रिपाई (ए) दौंड तालुक्याचे कार्यक्षम अध्यक्ष मा सचिन खरात यांच्या नेतृत्वात दौंड तालुका व शहर पदाधिकारी निवड करण्यात आली.
मा पवन थोरात यांची रिपाई (ए) दौंड तालुका युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व मा शशांक गायकवाड यांची रिपाई (ए) दौंड शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व मा बाबा कोरे यांची रिपाई (ए) दौंड शहर युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,यावेळी राज्य जिल्हा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते,तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांनी पक्ष वाढविण्यासाठी कटीबद्ध राहत जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
या निवडीमुळे सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.