Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

रेल्वेतून खाली पडला तरुण,पंचशील नगर येथील तरुणांनी वेळीच केले रुग्णालयात दाखल तरुणांचे वाचले प्राण..

0
0 0
Read Time2 Minute, 45 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव(प्रतिनिधी)-धावत्या रेल्वेतून पडला तरुण वेळीच केली तरुणांनी मदत ताबडतोब महात्मा फुले ट्रामा केअर ला घेऊन जात सुरू केले उपचार सुदैवाने वाचले तरुणांचे प्राण.
दि 6 ऑगस्ट रोजी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास भरधाव धावणाऱ्या साकेत एक्सप्रेस मधून दारात उभा असलेला अमर कुमार वय 28 वर्ष राहणार गोंडा उत्तर प्रदेश याचा तोल जाऊन तो रेल्वे खाली पडला ही घटना पंचशील नगर जवळच झाल्याने सुदैवाने पंचशील नगर येथील तरुण तेथे उपस्थित होते,तेथे उभे असलेल्या तरुणांनी धाव घेत त्याची विचारपूस करत तरुणास धीर दिला तसेच त्याला कुठे लागले आहे का तपासणी केली असता त्याच्या पायाला मोठी जखम झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता,त्या तरुणांनी रेल्वे पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती देत,त्या तरुणास दुखापत झाली असून त्वरित उपचार मिळणे आवश्यक असल्याचे कळविले रेल्वे पोलिसांनी कुमार यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगत तात्काळ घटना स्थळी धाव घेतली,तरुणांनी अरुण कुमार यास त्वरित उचलत जवळच असलेल्या महात्मा फुले ट्रामा केअर सेंटर येथे घेऊन जात तेथील डॉक्टरांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपचार सुरू केले योग्य वेळी उपचार मिळाल्याने अमर कुमार याची प्रकृती उत्तम असून वेळीच मदत मिळाल्याचे समाधान अमर कुमार यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तसेच कुमार यांनी सामाजिक कार्यकर्ते प्राशिक कदम,सत्तार मलिक, यशोदीप रणधीर,पंकज कदम, राकेश त्रिभुवन,मयूर कदम,संदीप सोनवणे,सचिन पवार,अजिंक्य त्रिभुवन,जयेश खरात,अनिरुद्ध सरोदे या मदत करणाऱ्या तरुणांचे आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: