लॅपटॉप चोर काही तासात लॅपटॉप सह शहर पोलिसांच्या ताब्यात

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
नागरिकांनी बस ट्रॅव्हल्स मध्ये प्रवासादरम्यान आपले मौल्यवान वस्तु, दागिणे, पैसे इत्यादीची काळजी घ्यावी-
पोलीस निरीक्षक संदीप पाटील
चाळीसगाव(प्रतिनिधी)-19 ऑगस्ट च्या पहाटे 6 वाजता खाजगी ट्रॅव्हल ने गाडीतून उतरत असताना लॅपटॉप चोरी झाल्याचे कळताच गाठले शहर पोलीस ठाणे शहर पोलिसांनी तपास चक्र फिरवत काही तासातच घेतले लॅपटॉप सह आरोपीला ताब्यात.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १९ ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हर्ष प्रविण पाटील वय २० वर्षे रा. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर हे पुणे येथुन सरस्वती ट्रॅव्हलने यांच्या गावी कन्नड येथे जात असतांना प्रवासादरम्यान ट्रॅव्हल सिग्नल चौक चाळीसगाव येथे सकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबली असता फिर्यादी हे ट्रॅव्हल्स मधुन खाली उतरत असतांना त्याच्या लक्षात आले कि,त्यांची लॅपटॉप असलेली बॅग ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले आहे. तेव्हा त्यांनी शोध घेतला परंतु काहीएक माहीती मिळुन आली नाही तेव्हा तात्काळ हर्ष पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४१४ / २०२३ भा. द. वी. कलम ३७९ प्रमाणे लॅपटॉप व बॅग असे सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले बाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मा. पोलीस अधिक्षक सो. एम राजकुमार, मा. अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या योग्य त्या सुचना दिल्या होत्या तपास दरम्यान गुन्हे प्रकटीकन शाखा मधील पोलीस अंमलदार पोना दिपक पाटील, पो.काँ अमोल भोसले यांना चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्स परिसरात एक इसम हा बिल नसलेला महागडा लॅपटॉप विक्री साठी घेवुन फिरत आहे अशी गोपनीय माहीती प्राप्त झाली. त्याप्रमाणे ताबडतोब पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोउपनि सुहास आव्हाड, पोहेका योगेश बेलदार, पोहेकाँ नितीन वाल्हे, पोना दिपक पाटील, तुकाराम चव्हाण, पो. काँ अमोल भोसले, गणेश कुवर, निलेश पाटील,शरद पाटील, प्रविण जाधव, नंदकिशोर महाजन, विनोद खैरणार, मोहण सुर्यवंशी असे पथक रवाना केले व सदर ठिकाणी जावुन संशयीत इसम नामे योगेश शामलाल पाटील, वय २७ वर्षे रा. जुनेगाव, कजगाव ता. भडगाव यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गुन्ह्यात चोरी गेलेला लॅपटॉप मिळुन आला आहे. नमुद आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून लॅपटॉप हर्ष पाटील यांना सोपविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या पुढील तपास पोना दिपक पाटील व पो.काँ अमोल भोसले हे करित आहेत.