Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे शिबीर संपन्न

0
1 0
Read Time4 Minute, 15 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.१९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले. सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते सरस्वती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. सदर शिबीरात श्री.पी.के.पाटील, शिक्षक, नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवळी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना केली. श्री. रमेश सुधाकर पोतदार, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव यांनी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ व ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर दोन मराठी कविता सादर केल्या. श्री.सचिनकुमार भुपेंद्र दायमा, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी ‘रॅगींग विरोधी कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या युवाशक्ती विषयी माहिती दिली. कु. सपना पावरा, इयत्ता ४थी ची विद्यार्थी हिने भारताचे संविधान वाचन केले. सदर शिबीरात शाळेतील श्री. सतिष पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक, नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवळी, श्री. तुषार खैरनार, प्राथमिक मुख्याध्यापक, नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवळी, शिक्षक वृंद व सर्व आदिवासी विद्यार्थी तसेच श्री.देवेश दिपक पवार, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार,वरिष्ठ लिपीक यांनी पाहिले. श्री.स्वप्नील पाटील, शिक्षक, नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवळी, ता.चाळीसगाव यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: