अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगांव-दरवर्षी मार्च महिन्यात चाळीशी गाठणारे तापमान महिन्याच्या शेवटी उष्णतेचा लाटेमुळे 40 ते 42 जाण्याची शक्यता उकाड्याने नागरिक हैराण यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या मुंबईसह कोकण वगळता बहुतांश भागात सरासरी कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास गेले आहे.
मार्च महिन्यातच राज्याचा पारा सरासरी ४१ अंशांवर गेल्याने यंदा मोसमी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानाचा पारा विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे ४३ ते ४६ अंशांपर्यंत पोहोचला असून, रायगडमधील भिरा येथेही विक्रमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्येही कमाल तापमान वाढणार आहे-डॉ. रामचंद्र साबळे, जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ
जास्तीत जास्त पाणी पेत सुती कपड्यांचे वापर करत बाहेर जातांना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा उन्हात काम करणाऱ्या कामगारांनी सुदधा काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांनी एक पत्रकाद्वारे केले आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्ण लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यांत ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल, अमरावती, बुलढाणा ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर ३१ मार्च, नागपूर ३० मार्च या कालावधीत उष्णतेची लाट तीव्र जाणवेल.