Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

वाढते कोरोना रुग्ण,खबरदारी म्हणून दौंड शहरातील काही भाग प्रतिबंधित घोषित

0
13 2
Read Time2 Minute, 15 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क.

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने दौंड शहरातील काही भाग प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.दौंड शहरातील शालिमार चौक दौंड जिल्हा पुणे या भागात कोरोना संक्रमित रुग्ण आढळला आहे.कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता.एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याने विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असल्याने त्यावर प्रतिबंधित उपाय आखणे गरजेचे आहे.१)प्रभाग क्रमांक-८ श्री विजय थोरात यांचे घर ते बंब चाळ रेल्वे हद्दीपर्यंत(पश्चिम बाजू),२)रेल्वे हद्दी कॉलनी(उत्तर बाजू),३)पडवळकर घर ते उत्सव अपार्टमेंट प्रभाग क्रमांक-७ चा भाग(पूर्व बाजू),४)उत्सव अपार्टमेंट मीरा सोसायटी शालिमार चौकाकडे जाणारा रस्ता तसेच अथर्व अपार्टमेंट ,फॉरेस्ट क्वार्टर तसेच दौंड शहरातील गजानन सोसायटी मधील या ठिकाणावरील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.१)प्रभाग क्रमांक-९ चा फराटे घर ते गजानन सोसायटी मधून दक्षिण बाजूने जाणारा रस्ता,२)गंधर्व अपार्टमेंटकडे जाणारा रस्ता,३)गजानन सोसायटी मधील चर्च परिसर,४)मयुरेश्वर अपार्टमेंट एरिगेशन चारी पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याची माहिती मा:श्री.प्रमोद गायकवाड(उपविभागीय दंडाधिकारी दौंड पुरंदर) यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: