अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
यावल(वृत्तसेवा)- गुरुवार दिनांक 8 मे रोजी तालुक्यातील तापी नदीपात्रात अवैध गौण खनिज(वाळू) वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांचे वाहन पात्रात उलटले असून तहसीलदार यांना सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
वाळू चोरांचा पाठलाग करतांना शासकीय वाहन तापी नदीच्या पात्रात उलटले आणि अपघात घडला. सुदैवाने त्यांना यात दुखापत झाली नाही.
विदगाव परिसरात अवैध वाळू भरून भरधाव वेगात पळवला जात असलेला ट्रॅक्टर पाहताच तहसीलदार नाझीरकर यांनी आपल्या पथकासह पाठलाग सुरू केला. हा पाठलाग करत असताना, त्यांचे वाहन (MH 19 CV 0419) यावर असलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने ते थेट तापी नदीच्या पात्रात उलटले.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तहसीलदार नाझीरकर आणि त्यांच्या पथकातील सदस्य सर्वजण सुखरूप बचावले. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच, जळगावच्या उपविभागीय अधिकारी (तहसीलदार) डॉ. उमा ढेकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला असे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान ट्रॅक्टर चालक व अन्य जबाबदार व्यक्तींविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
