वाळू चोरी सह अन्य 5 गुन्हे दाखल असलेल्या तरुणावर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
यापुढे भविष्यात अशा प्रकारचे सराईत गुन्हे करुन, चाळीसगांव शहराची शांतता भंग करणारे तसेच शहरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांविरुध्द मोक्का, एम.पी.डी.ए. व इतर कठोर कायद्यान्वये अतीशय कडक कारवाई करुन त्यांना जास्तीत जास्त दिवस कारागृहात स्थानबध्द करण्यात येईल.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर पो.स्टे. गैरकायद्याची मंडळी जमवुन शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी करणे, साथीदारांसह गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे एकुण 05 गुन्हे दाखल असलेल्या निखिल उर्फ सुनील कुडे या 24 वर्षीय तरुणावर एम.पी.डी.ए कायद्या अंतर्गत शहर पोलिसांची कारवाई.
निखील उर्फ पिया सुनिल कुडे वय 24 वर्षे रा. एम.जे. नगर, चाळीसगांव जि. जळगांव याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. ला गैरकायद्याची मंडळी जमवुन शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी करणे, साथीदारांसह गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे एकुण 05 गुन्हे दाखल होते. तसेच नमुद इसमाविरुध्द वेळोवेळी प्रतीबंधात्मक कारवाई करण्यात येवुन देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नव्हता.
नमुद इसमास वाळु चोरीचे गुन्हे करण्याची सवय असल्याने त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड संहीता व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती. दिवसे-दिवस वेगवेगळया तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता.
त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन 1981 नुसार ” वाळु तस्कर” या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार संदीप पाटील, पोलीस निरीक्षक यांनी मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो.श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे निखील उर्फ पिया सुनिल कुडे याचे विरुध्द संदीप पाटील, पोलीस निरीक्षक यांनी पोना/विनोद विठ्ठल भोई यांच्या तसेच पोना/तुकाराम चव्हाण, पोकॉ चत्तरसिंग महेर, पोकॉ दिलीप सत्रे, पोकॉ प्रविण देवरे, पोकॉ विजय पाटील, पोकॉ समाधान पाटील मदतीने चौकशी पुर्ण करुन दिनांक 16 जून 2023 रोजी मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव श्री एम. राजकुमार सो यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांनी मा. जिल्हादंडाधिकारी सो. जळगांव यांच्या कार्यालयात पाठविला होता.
दिनांक 17 जुलै 2023 रोजी मा.जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडील आदेश क्रमांक दंडप्र./कावि/एम.पी.डी.ए./59/2023 जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जळगाव दिनांक 17 जुलै 2023 अन्वये एम.पी.डी.ए.कायद्यान्वये निखील उर्फ पिया सुनिल कुडे वय 24 वर्षे रा. एम.जे. नगर, चाळीसगांव जि. जळगांव याचे विरुध्द स्थानबध्दतेचा आदेश जारी केल्याने मा. श्री एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक, जळगांव, मा. श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव व मा. श्री अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधिक्षक, चाळीसगांव विभाग यांच्या मागदर्शनाखाली संदीप पाटील व पथकातील पोना विनोद भोई, पोना राहुल भिमराव सोनवणे, पोकॉ विजय पाटील, पोकॉ भरत गोराळकर अशांनी दिनांक 17 जुलै 2023 रोजी सदर इसमास ताब्यात घेण्यात आले होते. त्याची मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर जि. कोल्हापुर येथे रवानगी करणेकामी सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक, पोना दिपक प्रभाकर पाटील, पोकाँ अमोल युवराज भोसले यांच्या ताब्यात देवुन रवानगी करण्यात आलेली आहे.
यापुर्वी देखील सराईत गुन्हेगार नामे निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय 21 वर्षे रा. नारायणवाडी, चाळीसगांव यास मध्यवर्ती कारागृह, अमरावती व वाजीदखान साबीरखान वय 23 वर्षे रा. नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगांव ता. चाळीसगांव जिल्हा जळगाव यास मध्यवर्ती कारागृह येरवडा, जि. पुणे येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.