चाळीसगाव(प्रतिनिधी): दि १७/०१/२०२० शुक्रवार रोजी वाहतूक सप्ताहानिमित्त आयोजित रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
रस्ता सुरक्षेच्या प्राथमिक कल्पनांची ओळख करुन घेत वाहतुकीच्या नियमासंदर्भात लावलेल्या वेगवेगळ्या चिन्हांचे अर्थ, महत्त्व देखील वाहनचालकांची जबाबदारी असून त्याचे महत्व समजावून घेणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन उप प्रादेशिक परीवहन अधिकारी शाम लोही यांनी केले. ते आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व बी पी आर्टस् ,सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, हेरंब ऑटो आयोजित “सुरक्षित सफर…खुशहाल जिंदगी…” या विषयावर बोलत होते. यावेळी मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण भाऊ अग्रवाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदिप देशमुख, सचिव रोशन ताथेड, प्रकल्प प्रमुख हर्षद ढाके, प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, जेष्ठ पत्रकार रमेश जानराव आदी उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिस्तीची ओळख या वयातच करणे गरजेचे असून ती पाळण्यासाठी देखील कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे. शिस्तीने वागण्याची सुरुवात ही घरातूनच होत असते. घरात असो की सार्वजनिक ठिकाणी शिस्तीने वागणे ही एक जगण्याची पध्दतच प्रत्येकाने अवलंबायला हवी. रस्तासुरक्षेच्या प्राथमिक कल्पनांची ओळख करुन घेत पादचारी मार्गाचा वापर करण्याचे महत्त्व व रस्ता क्रॉस करताना घ्याव्या लागणा-या काळजीची माहिती करुन घेतली पाहिजे तर रस्त्यावर लावलेल्या वाहतुकीच्या नियमासंदर्भात लावलेल्या वेगवेगळ्या चिन्हांचे अर्थ, महत्त्व देखील वाहनचालकांची जबाबदारी असून त्याचे महत्व समजावून घेणे महत्वाचे असल्याचे शाम लोही यांनी सांगितले.
वाहतुकीची कर्तव्ये न पाळल्यामुळे अपघात होत असतात. यातून होणारी मनुष्य हानी आणि त्यातल्या त्यात क्रियाशील मनुष्यांची हानी आर्थिक विकासात अडथळा निर्माण करते. या अपघातांची कारणे शोधायला हवीत असे डॉ. संदिप देशमुख यांनी सांगितले तर आजच्या काळात निर्माण झालेल्या आणि वाढत चाललेल्या स्वतःविषयक असलेल्या असुरक्षिततेच्या समस्या हे अपघाताचे प्रमुख कारण राहिले असल्याचे प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी सांगितले
यावेळी उपप्राचार्य प्रकाश बाविस्कर, अजय काटे, रोटे बलदेव पुन्शी, रोटे मधुकर कासार, रोटे स्वप्नील कोतकर, रोटे संग्रामसिंग शिंदे, रोटे अनिल मालपुरे, रोटे सनी वर्मा,बापूराव सोनवणे, संदिप हडप आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर य ना चव्हाण महाविद्यालयात देखील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व अमन मोटर्स,संकलेचा ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व रस्ता सुरक्षेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले, व त्या योगे वाहतूक नियमांचे व दुचाकी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ S R जाधव सर, सूर्यवंशी सर, श्याम लोही साहेब, रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ संदीप देशमुख, रोटे संकेत छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.