वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 60 लाख 26 हजार 152 रु किंमतीचा गुटखा जप्त….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि 09फेब्रुवारी 2023 रोजी सपोनि श्री. तुषार देवरे शहर वाहतुक शाखा सोबत पोना नरेंद्र पाटील, पोना दिपक पाटील, चालक पोहेकॉ शांताराम थोरात असे चाळीसगांव शहरात पेट्रोलींग करीत असतांना दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांना आयशर गाड़ी क्रं.एच आर-74-बी-2490 ही भडगांव रोडने जळगांव कडुन छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येतांना दिसली त्यांना सदर गाडी बाबत संशय आल्याने त्यांनी सदरची गाडी थांबवुन गाडीत असलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गाडी पोलीस ग्राऊंड येथे आणुन माल खाली केला असता गाडीमध्ये गुटखा असल्याचे आढळून आले वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एकुण 60 लाख 26 हजार 152/- रुपये किंमतीचा राज निवास पान मसाला नावाचा गुटखा व जाफरानी जर्दा तंबाखु मिळुन आला व सोबत अशोक लेलॅण्ड कंपनीचा आयशर ट्रक क्रं. एच आर -74-बी-2490 किं. अंदाजे 10 लाख- असा एकुण 70 लाख 26 हजार 152/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून हा गुटखा हा कोटा राजस्थान येथून भरलेला असुन नाशिक येथे घेवुन जात असल्याचे चालकाने सांगीतले. गाडीत असलेल्या आरोपी नशीब खान हुसैन खान वय 34 वर्षे रा.ग्राम घसेडा ता.होडल जि. फरीदाबाद ( हरीयाना), सोहेल खान नजबु खान वय 21 वर्षे रा. ग्राम पालमपुर ता. जि. फरिदाबाद (हरियाना), साजीद याकुब खान वय 30 वर्षे रा. आलमपुर ता. जि. फरिदाबाद (हरियाना) असे तिन्ही लोकांना ताब्यात घेतले असून सदर गाडीतील मालाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. एम. राजकुमार पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या आदेशान्वये व मा. श्री. रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ, मा. श्री. अभयसिंह देशमुख सहा. पोलीस अधिक्षक चाळीसगांव उपविभाग तसेच पो.नि.के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेचे सपोनि. तुषार देवरे, पोना नरेंद्र पाटील, पोना दिपक पाटील, चालक पोहेकॉ शांताराम थोरात यांनी केलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री. दिपक बिरारी, पोना विनोद भोई, पोना राहुल सोनवणे, पोना दिपक पाटील, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ अमोल पाटील हे करीत आहेत.