विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा – सागर नागणे

2 0
Read Time3 Minute, 26 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

स्वप्नपूर्ती अकॅडमी येथे विज्ञान दिन साजरा


चाळीसगाव : पूर्वी शिक्षणाचा अभाव असल्याने अनेक जण बुवाबाजीला बळी पडत होते. मात्र हल्लीची पिढी सुशिक्षित आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे प्रतिपादन सागर नागणे यांनी केले. ते स्वप्नपूर्ती अकॅडमी येथे विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सागर नागणे यांच्यासोबत, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुषमा देशमुख, स्वप्नपूर्ती अकॅडमीचे संचालक आकाश धुमाळ, सहकारी दामिनी देशमुख उपस्थित होते.
पुढे नागणे म्हणाले की, चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचे उत्तर शोधत जाणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे होय. त्यामुळे प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी नारळावर पाणी टाकून आग लावणे, ग्लास मध्ये पाण्याचे थेंब टाकून चॉकलेट बाहेर काढणे, बंद चिट्टी चे वाचन करणे असे प्रयोग करून, त्या मागील हातचलाकी त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा सुषमा देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हटले की, विद्यार्थी हा प्रश्नप्रिय हवा, त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याने आपल्या शिक्षकांना अथवा इंटरनेटवरून अभ्यासावे. विज्ञानाचे प्रात्यक्षिके केल्याने त्याची विज्ञानाविषयी गोडी वाढते व यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जातो. त्यामुळे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकातून विज्ञान कसे शिकवले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तीलक जगताप, मोहित वाघ, अनुराज पाटील, यश गवळी, निलेश चव्हाण, जयेश एरंडे, विजय मुलमुले यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राणी राठोड व गौरव मांडोळे यांनी केले. तर आभार प्रतिक राखुंडे यांनी मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.