अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
विराज जगताप यांची निघृण हत्या म्हणजे मानवतेला कलंक लावणारी घटना आहे राज्य शासनाने या हत्येची सी, आय, डी चौकशी करून खुन्यांना कठोर शिक्षा द्यावी तसेच शासनाने विराज जगताप यांच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत दयावी अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा,जोगेंद्र कवाडे यांनी पिंपळे सौदागर येथे करून विराज जगताप यांच्या हत्येचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध केला , प्रारंभी प्रा, जोगेंद्र कवाडे यांनी व पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे भगवान बुध्द यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून वंदन केले, डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले तर विराज जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सामुदायिक श्रधांजली वाहीली, या वेळी पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद सुर्वे, पक्ष नेता आमिन शेख, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रामदास ताटे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे, तालुका अध्यक्ष राजू जाधव उपस्थित होते